ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:52 IST2022-02-08T17:52:03+5:302022-02-08T17:52:57+5:30
Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते.

ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज
सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण हे ट्रेंड फॉलो करतात आणि त्यावर आपल्या भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कच्चा बादाम आणि श्रीवल्ली ही दोन गाणी तुफान ट्रेंड होत आहेत. यामध्येच अभिनेत्री रुपाली भोसले ( rupali bhosale) हिने श्रीवल्लीवर एक रिल केलं आहे. परंतु, या व्हिडीओमध्ये तिने तिचा वेगळा टच दिला आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. यामध्येच तिने श्रीवल्लीचा ट्रेंड फॉलो केला आहे. परंतु, या व्हिडीओमध्ये तिने अल्लू अर्जुनप्रमाणे खांदा न उडवता तिच्या पद्धतीने व्हिडीओ शूट केला आहे.
दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने हिरव्या आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली आहे. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी तिने हा व्हिडीओ शूट करुन तो एकत्र करत पोस्ट केला आहे. सध्या रुपालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे.