सहकुटुंब सहपरिवार; पश्याशिवाय साजरा होणार मोरे कुटुंबाचा गुढीपाडवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:47 IST2023-03-20T18:47:27+5:302023-03-20T18:47:52+5:30
Sahakutumba sahaparivar: 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही

सहकुटुंब सहपरिवार; पश्याशिवाय साजरा होणार मोरे कुटुंबाचा गुढीपाडवा?
सध्या सगळे जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे मालिकांमध्येही हा उत्साह दिसून येत आहे. अनेक मालिकांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतही गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र, यावेळी मोरे कुटुंबीय पश्याशिवाय दारापुढे गुढी उभारणार आहेत.
मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वीच पश्याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पश्याच्या अशा एकाकी निघून जाण्यामुळे संपूर्ण मोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्येच आता गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे पश्याशिवाय हा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न संपूर्ण कुटुंबाला पडला आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही असा प्रश्न मोरे कुटुंबासमोर होता. मात्र, अशा विचारात असताना पश्या येऊन गुपचूप पुजेची तयारी केली. त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे. त्यामुळे यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत.