'जीव माझा गुंतला'मध्ये उत्कंठावर्धक वळण, मल्हार आणि अंतराच्या प्रेमाची अग्निपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:28 IST2022-07-09T13:05:58+5:302022-07-09T13:28:27+5:30
जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या नात्याला अनेक वळण आली. दोघांनी कठीण परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले.

'जीव माझा गुंतला'मध्ये उत्कंठावर्धक वळण, मल्हार आणि अंतराच्या प्रेमाची अग्निपरीक्षा
जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या नात्याला अनेक वळण आली. दोघांनी कठीण परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. अनेक कसोट्या पार पाडल्या. आणि तेव्हापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती की, कधी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडणार ? कधी यांचा जीव एकमेकांमध्ये गुंतणार. पण, आता मात्र, तसं काहीसं होताना दिसून येतं आहे मल्हारने दिलेल्या सरप्राईझने अंतराचे मन भरून आले. ज्यामध्ये अंतराला त्याने बिझनेस पार्टनर होशील का असं विचारलं, हे बघताच अंतराला अश्रु अनावर झाले.
या सरप्राईझच प्लानिंग तो बरेच दिवस करत होता. आता हळूहळू यांच्या नात्यातला गोडवा वाढू लागला आहे हे नक्की ! अंतराच्या प्रेमात मल्हार पडला आहे हे मात्र चित्राला सहन होत नाहीये. त्यामुळे अंतरा आणि मल्हारमध्ये दुरावा आणण्यासाठी आता ती पुन्हा अजून एक खेळी रचणार आहे. मल्हारवर हल्ला करण्यासाठी ती काही गुंड पाठवणार असून येत्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कशी मल्हारला अंतराची साथ मिळणार आहे ? त्याच्यावर होणारा वार ती स्वत:वर घेऊन कशी मल्हारला वाचवणार. शूटरने मल्हारवर चालवलेली गोळी अंतरा स्वत:वर घेऊन मल्हारचा जीव वाचवणार आहे.
या सगळ्या घटनेमुळे चित्रा काकीचा डाव तिच्यावरच उलटणार आहे कारण, यानंतर मल्हार आणि अंतरा अजून एकेमकांच्या जवळ येणार आहेत. मालिकेमध्ये आता पुढे काय होणार ? अंतरा आणि मल्हारच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार ? हे आपल्याला लवकरच कळेल.