SO CUTE!! ‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:46 PM2022-06-09T12:46:23+5:302022-06-09T12:47:40+5:30

Marathi Actress Meenakshi Rathod shared Video of daughter : मीनाक्षीच्या युट्यूब चॅनलवर लेकीच्या पहिल्या फोटोशूटचा अख्खा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

marathi couple Meenakshi Rathod kailash waghmare baby girl first photoshoot VIDEO | SO CUTE!! ‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO

SO CUTE!! ‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO

googlenewsNext

Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Devaki aka Meenakshi Rathod shared Video of daughter :  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतील देवकी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) नुकतीच आई झाली. नुकताच तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला. घरी कन्यारत्न जन्मल्याचा आनंद वेगळाच. सध्या मिनाक्षी व तिचा नवरा कैलाश वाघमारे (kailash waghmare) तान्ह्या लेकीचं कोडकौतुक करण्यात, तिच्या बाललीला पाहण्यात दंग आहेत.  मीनाक्षीच्या युट्यूब चॅनलवर लेकीच्या पहिल्या फोटोशूटचा अख्खा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

मिनाक्षीच्या लेकीचं पहिलं फोटोशूट आणि तिचे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.मीनाक्षीची लेक तिच्याइतकीच सुंदर आहे. फोटोशूट तर झक्कास आहे. पण चिमुकलीचे फोटोही तितकेच झक्कास आहे. 

 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली देवकीची भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. काहीशी वेंधळी, मनानं तशी स्वच्छ पण कुणाच्याही सांगण्यावरून वाईट वागणारी देवकी तिनं अप्रतिम साकारली. अगदी नवव्या महिन्यापर्यंत मीनाक्षी काम करत होती. सध्या मीनाक्षीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तिच्या जागी देवकी म्हणून भक्ती रत्नपारखी दिसत आहे.

2018 मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 2020 मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. मीनाक्षीने अनेक लघुपटांमध्ये काम केलंय.  मीनाक्षीचा पती कैलास वाघमारेने तान्हाजी: द अनसंग वारिअर, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो सुद्धा एक उत्तम अभिनेता आहे.

Web Title: marathi couple Meenakshi Rathod kailash waghmare baby girl first photoshoot VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.