धबधब्याखाली चिंब भिजले स्वानंदी अन् आशिष; व्हेकेशनचे फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:28 PM2023-08-31T12:28:20+5:302023-08-31T12:29:09+5:30

या जोडीने प्रेमाची कबुली दिल्यापासून ते सातत्याने चर्चेत येत आहेत.

marathi actress swanandi-tikekar-and-ashish-kulkarni-vacation mood on | धबधब्याखाली चिंब भिजले स्वानंदी अन् आशिष; व्हेकेशनचे फोटो होतायेत व्हायरल

धबधब्याखाली चिंब भिजले स्वानंदी अन् आशिष; व्हेकेशनचे फोटो होतायेत व्हायरल

googlenewsNext

'दिल दोस्ती दुनियादारी' म्हणत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिटेकर. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी स्वानंदी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णी याला डेट करत असल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर त्याच्यासोबत साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्काही दिला. त्यामुळे ही जोडी सध्या सातत्याने चर्चेत येत आहे.

कलाविश्वात स्वानंदी आणि आशिष यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा झाली. अगदी लग्नासारखं साग्रसंगीतपणे या दोघांचा साखरपुडा पार पडला. या जोडीने प्रेमाची कबुली दिल्यापासून ते सातत्याने चर्चेत येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर स्वानंदी आणि आशिष यांच्या व्हेकेशनचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ही जोडी एका निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्याचं दिसून येत आहे. आशिषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो स्वानंदीसोबत धबधब्याखाली भिजतोय. 

दरम्यान, स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. त्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर, आशिष अलिकडेच 'इंडियन आयडॉल १२' मध्ये दिसला होता.
 

Web Title: marathi actress swanandi-tikekar-and-ashish-kulkarni-vacation mood on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.