'टीव्ही अभिनेत्रींना घरकाम येत नाही'; ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:47 IST2023-04-28T16:46:25+5:302023-04-28T16:47:00+5:30
Surbhi bhave: अभिनेत्रींना घरातली काम येत नाहीत असं म्हणत ट्रोल केलं जातं. मात्र, लोकांचा हा समज चुकीचा असल्याचं म्हणत सुरभीने तिचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'टीव्ही अभिनेत्रींना घरकाम येत नाही'; ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
कलाविश्वातील सेलिब्रिटींना जसं चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं तसंच बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यात खासकरुन अभिनेत्रींना या ट्रोलिंगचा जास्त अनुभव येतो. अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन, त्यांच्या अभिनयावरुन वा वैयक्तिक जीवनातील गोष्टींवरुन ट्रोल केलं जातं. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी भावे यांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
बऱ्याचदा अभिनेत्रींना घरातली काम येत नाहीत. त्यांना ऐशोआरामाची सवय असते असं म्हणत ट्रोल केलं जातं. मात्र, लोकांचा हा समज चुकीचा असून आम्ही घरकामातही तितक्याच सराईत आहोत हे सुरभीने दाखवून दिलं आहे. तिने तिच्या घरातील कामांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'सेक्सी व्हिडीओ पाठव'; मराठी अभिनेत्रीकडे नेटकऱ्याने केली विचित्र मागणी
"आजचा व्हिडीओ थोडा वेगळा असणार आहे. कारण, खूप लोकांना वाटतं की टिव्हीत काम करणाऱ्या मुली किंवा नट्या घरी काहीही काम करत नसतील. असा समज असतो. पण, हा समज खूप खोटा आहे. माझ्या घरी मीच जेवण करते आणि आता मी हे थालिपीठ करतीये. ब्रेकफास्ट करुन मी आता माझ्या रिहर्सलला निघणार आहे. तिकडून आल्यानंतर मी जेवण बनवणार आणि मग तुम्हा पुढच्या रिहर्सलला जाणार. सो हा आहे आमचा घरगुती अवतार", असं सुरभी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तुम्हा आम्ही मेकअप केलेल्या रुपात आवडत असलो तरी घरच्यांसाठी या रुपात काही तरी छानसं करायचं, त्यांना खाऊ-पिऊ घालायचं त्याचा हा जो ग्लो आहे ना तो खूप वेगळा आहे."
दरम्यान, सुरभी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने स्वामिनी, ३६ गुणी जोडी या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच,पावनखिंड,चंद्रमुखी,त्रिभंगा या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.