'नाचताना माझा गुडघा अचानक..'; मराठी अभिनेत्रीवर आली वॉकर घेऊन चालण्याची वेळ, काय घडलं?

By देवेंद्र जाधव | Updated: July 13, 2025 14:25 IST2025-07-13T14:24:11+5:302025-07-13T14:25:33+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर एक शारीरिक संकट ओढवलं. गेले दोन-तीन महिने अभिनेत्रीने या मोठ्या दुखण्याचा सामना केला आहे. जाणून घ्या काय घडलं

Marathi actress sukhada khandkekar undergoes ligament surgery walk with a walker | 'नाचताना माझा गुडघा अचानक..'; मराठी अभिनेत्रीवर आली वॉकर घेऊन चालण्याची वेळ, काय घडलं?

'नाचताना माझा गुडघा अचानक..'; मराठी अभिनेत्रीवर आली वॉकर घेऊन चालण्याची वेळ, काय घडलं?

सुखदा खांडकेकर ही सर्वांची लाडकी मराठी अभिनेत्री. सुखदाला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सुखदा एक उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय ती कुशल नृत्यांगनाही आहे. सुखदाला अलीकडेच मोठ्या शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं. सुखदाने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून तिला झालेल्या आजाराचा खुलासा केलाय. नाचताना गुडघा ट्विस्ट झाला आणि सुखदाला मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. काय घडलं नेमकं जाणून घ्या

सुखदावर आली वॉकर घेऊन चालायची वेळ

सुखदाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन ती लिहिते, "कहाknee में ट्विस्ट.. आराम कोणाला आवडत नाही? पण कंपल्सरी आराम..  नको रे बाबा.. नाचताना एकदा गुडघा ट्विस्ट झाल्याच निमित्त झालं आणि 29th April 2025 ला डायरेक्ट ऑपरेशन करून आराम करायला मी खऱ्या अर्थाने एका पायावर तयार झाले. खरंतर लिगामेंट टेअरच्या ऑपरेशन नंतर किमान ३ महिने आराम, फिजिओथेरेपी आणि हळूहळू रिकवरी अपेक्षित असते. पण मी तर २ महिन्यानंतर चा कार्यक्रम घेऊन ठेवला होता, तोही नाच आणि थेट युरोपियन मराठी संमेलन, लेस्टर मध्ये!"

"मग मनाचा हिय्या करून छान लवकर बरं व्हायचं असा चंगच बांधला. बसून वजन वाढू नये म्हणून योग्य डाइट, फिजिओथेरेपी, बरोबर च मनाचा निश्चय किती महत्त्वाचा असतो हे ह्या निमित्ताने पुन्हा लक्षात आल. One day at a time म्हणत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्दीने माझे प्रयत्न सुरू ठेवले. ह्या संपूर्ण काळात माझी आई (चित्रा), माझा नवरा - bestie (अभिजीत खांडकेकर), देवेंद्र पेम दादा आणि दिनेश लाड sir, ज्यांनी डॉक्टर शोधण्या पासून, लवकरात लवकर appointment मिळवुन देण्यापर्यंत सगळं केलं."




"माझे मित्र - मैत्रिणी आणि माझा नवीन मित्रच झालेला वॉकर ह्यांनी खूप साथ दिली. इवेंट ऑर्गनायझर अमोलचे विशेष आभार, माझ्या वर विश्वास ठेवला, मला choreography मध्ये पूर्ण liberty दिली, Choreographer अतुल कुलकर्णींनी जमतील अश्या स्टेप्स बसवून काम जरा सोपं केल. Leicester च्या स्थानिक कलाकारांचे आभार, ज्यांनी मला मोलाची साथ दिली. आणि अखेर २ महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रत्येक नर्तिकेला, अभिनेत्रीला ज्याची ओढ असते त्या रंगभूमीवर पुन्हा दमदार पाऊल टाकल."

"हे सगळं सविस्तर लिहायचं कारण माझं कौतुक नसून माझा प्रयत्न आहे अश्या सगळ्यां पर्यंत हा संदेश पोहोचवायचा की तुम्ही मनात आणला तर तुम्हाला काहीही, कोणीही रोखू शकत नाही. मग शारिरीक आजार असो किंवा मानसिक, फक्त मनात ठरवता आलं पाहिजे मग... sky is the limit!" अशाप्रकारे सुखदाने सविस्तर सांगितलं. सुखदाच्या धाडसीपणाचं आणि जिद्दीचं सर्वांनी कौतुक केलं.

Web Title: Marathi actress sukhada khandkekar undergoes ligament surgery walk with a walker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.