सासू सुप्रसिद्ध अभिनेत्री तर नवराही आहे अभिनेता; फोटोत दिसणारी चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 12:47 PM2024-03-31T12:47:19+5:302024-03-31T12:47:44+5:30

फोटोतल्या चिमुकलीला ओळखलं का? अभिनयाने गाजवतेय मराठी कलाविश्व

marathi actress shivani rangole shared special post for her mother childhood photos | सासू सुप्रसिद्ध अभिनेत्री तर नवराही आहे अभिनेता; फोटोत दिसणारी चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम

सासू सुप्रसिद्ध अभिनेत्री तर नवराही आहे अभिनेता; फोटोत दिसणारी चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम

टीव्ही आणि सिनेजगतातील अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. ते लहानपणी कसे दिसायचे? त्यांच्या कुटुंबात कोणकोण असतं? याची माहिती चाहत्यांना हवी असते. कलाकारही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अनेकदा कलाकार त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देताना दिसतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीने तिचे बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. 

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवरुन लहानपणीचे आईबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "हॅपी बर्थडे आई! आज मी जी काही आहे ती फक्त तुझ्यामुळेच आहे. माझ्यातली एकही चांगली गोष्ट तुझ्याशिवाय शक्य झाली नसती", असं म्हणत अभिनेत्रीने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीची सासू आणि नवराही कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं का?

फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे आहे. शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम करून स्वत:ची ओळख निर्माण केली. 'सांग तू आहेस का', 'आम्ही दोघी', 'बन मस्का' अशा मालिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत होती. तर सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तिने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

शिवानी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून आहे. मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णीबरोबर शिवानीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. विराजसदेखील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच त्याचं दिग्दर्शनही केलेलं आहे. 'सुभेदार' या ऐतिहासिक सिनेमात सासू, सून आणि मुलाचं हे त्रिकुट पाहायला मिळालं होतं. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, शिवानी आणि विराजस एकत्र काम करताना दिसले होते. 

Web Title: marathi actress shivani rangole shared special post for her mother childhood photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.