मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची दीपिका पादुकोणशी होतेय तुलना, ओळखलंत का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:17 PM2022-02-23T13:17:05+5:302022-02-23T13:28:14+5:30

बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

Marathi actress rutuja bagwe share her glamours photo, fans compare her look with deepika padukone | मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची दीपिका पादुकोणशी होतेय तुलना, ओळखलंत का तिला?

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची दीपिका पादुकोणशी होतेय तुलना, ओळखलंत का तिला?

googlenewsNext

बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्या  भूमिका,आगामी प्रोजेक्टस यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. अशीच अनेक मराठमोळी अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे जी सोशल मीडियावर सक्रिय असते. ऋतुजाने इन्स्टाग्रामवर तिचा नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. व्हाईट आणि पिंक रंगाच्या शर्टमध्ये ऋतुजा खूपच स्टाईलिश दिसतेय. कमाल दिसत्येस ऋतू, सुपर हॉट, बोल्ड ब्युटी, ब्युटीफुल अशा कमेंट्स चाहत्यांची तिच्या फोटोवर केल्या आहेत. काही फॅन्सनी ऋतुजाच्या नव्या लुकची तुलना बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणशी केली आहे. फोटोतील ऋतुजाचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. सोशल मीडियावर ऋतुजा तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घालायला सुरूवात केली आहे.

 तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. सध्या ती सुबोध भावेसोबत चंद्र आहे साक्षीला मालिकेत झळकते आहे.


 

Web Title: Marathi actress rutuja bagwe share her glamours photo, fans compare her look with deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.