ऋतुजा बागवेच्या घरात आहे 'या' अभिनेत्याचा फोटो, म्हणाली, "माझं त्याच्यावर प्रेम..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:42 AM2023-10-02T11:42:12+5:302023-10-02T11:42:29+5:30

ऋतुजाने नुकतंच तिचं नवं घर खरेदी केलं आहे. मुंबईसोडून ऋतुजा ठाण्याच्या निसर्गरम्य परिसरात शिफ्ट झाली आहे.

marathi actress rutuja bagwe has ranbir kapoor photo in her house said i love him | ऋतुजा बागवेच्या घरात आहे 'या' अभिनेत्याचा फोटो, म्हणाली, "माझं त्याच्यावर प्रेम..."

ऋतुजा बागवेच्या घरात आहे 'या' अभिनेत्याचा फोटो, म्हणाली, "माझं त्याच्यावर प्रेम..."

googlenewsNext

ऋतुजा बागवे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कॉलेज जीवनापासून अभिनय क्षेत्रातील कारकीर्द सुरू करणाऱ्या ऋतुजाने गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारुन ऋतुजाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिचं 'अनन्या' हे नाटकही प्रचंड गाजलं. ऋतुजाने नुकतंच तिचं नवं घर खरेदी केलं आहे. 

मुंबईसोडून ऋतुजा ठाण्याच्या निसर्गरम्य परिसरात शिफ्ट झाली आहे. 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऋतुजाने तिच्या घराची गोष्ट सांगितली. ऋतुजाने तिचं घर छान वस्तूंनी सजवलं आहे. घराचे कोपरेही तिने आकर्षक केले आहेत. अशाच एका घराच्या कोपऱ्यात ऋतुजाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा फोटोही लावला आहे. घरात रणबीर कपूरचा फोटो लावण्यामागचं कारण ऋतुजाने या मुलाखतीत सांगितलं आहे. 

ऋतुजा म्हणाली, "रणबीर कपूर माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर तो दिसावा असं मला वाटतं. म्हणून मी घरात त्याचा फोटो लावला आहे. माझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ती भिंत आवडते." 

ऋतुजाने 'नांदा सौख्य भरे', 'चंद्र आहे साक्षीला' या सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अंकुश' या चित्रपटातून ऋतुजा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून यात ती नंदिनी सुर्वेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: marathi actress rutuja bagwe has ranbir kapoor photo in her house said i love him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.