'बिग बॉस'फेम रेशम टिपणीसच्या आईला पाहिलंय का? हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:45 PM2023-04-10T18:45:00+5:302023-04-10T18:45:00+5:30

Resham Tipnis: सध्या सोशल मीडियावर रेशम आणि तिच्या आईचा एक फोटो व्हायरल होत आहे.

marathi actress Resham Tipnis look like mother see photo | 'बिग बॉस'फेम रेशम टिपणीसच्या आईला पाहिलंय का? हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहे अभिनेत्री

'बिग बॉस'फेम रेशम टिपणीसच्या आईला पाहिलंय का? हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहे अभिनेत्री

googlenewsNext

‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस  (Resham Tipnis). उत्तम अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर रेशमने मराठी कलाविश्वातील एक काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही तिची लोकप्रियता तितकीच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. सध्या चाहत्यांमध्ये रेशमच्या वैयक्तिक आयुष्याची आणि खासकरुन तिच्या आईची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली रेशम कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफचे अपडेट चाहत्यांना देत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर रेशम आणि तिच्या आईचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोकडे पाहिल्यानंतर रेशम अगदी आपल्या आईसारखी दिसत असल्याचं जाणवतं. त्यामुळे रेशम हुबेहूब आपल्या आईची कार्बनकॉपी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच रेशमच्या आईचं निधन झालं. याविषयी रेशमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली. इतकंच नाही तर तिने दिलेलं कॅप्शन पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. विशेष म्हणजे रेशमने या पोस्टसोबत तिच्या आईचा फोटोही शेअर केला होता. 
 

Web Title: marathi actress Resham Tipnis look like mother see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.