न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली मराठमोळी अभिनेत्री, नवऱ्याकडून मिळालं खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:57 AM2024-04-03T10:57:52+5:302024-04-03T10:58:34+5:30

अभिनेत्रीने 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत काम केलं आहे.

marathi actress Pranjal Ambavane thipkyanchi rangoli fame on New York Times Square Screen | न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली मराठमोळी अभिनेत्री, नवऱ्याकडून मिळालं खास सरप्राईज

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली मराठमोळी अभिनेत्री, नवऱ्याकडून मिळालं खास सरप्राईज

न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर एक मराठमोळी अभिनेत्री झळकली आहे. स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' मध्ये भूमिका साकारलेली ही अभिनेत्री थेट टाईम्स स्क्वेअरवर आली आहे. तिच्या नवऱ्याने तिला खास सरप्राईज दिलं असून अभिनेत्रीने तिकडेच वाढदिवस साजरा केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अप्पूच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री आठवतेय का? होय नेत्रा असं अप्पूच्या बहिणीचं नाव असतं. ही भूमिका अभिनेत्री प्रांजल आंबवणेने (Pranjal Ambavane) साकारली होती. सध्या प्रांजल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे तिच्या वाढदिवशी नवऱ्याने तिला खास सरप्राईज दिलं. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर आपले फोटो झळकल्याने ती भलतीच खूश झाली. प्रांजलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिला मिळालेलं हे स्पेशल सरप्राईज दाखवलं. ती लिहिते, "आतापर्यंतचं सर्वात मस्त बर्थडे सरप्राईज. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर 18 हजार स्क्वेअर फीट स्क्रीनवरुन मला शुभेच्छा मिळाल्या. थँक्यू यू Hubby. खूप प्रेम."

प्रांजलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञानदा रामतिर्थीकरनेही तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिका संपल्यानंतर प्रांजल भावूक पोस्ट शेअर केली होती. अभिनयाव्यतिरिक्त प्रांजलला पेंटिंगचीही आवड आहे. सध्या ती नवऱ्यासोबत परदेशात असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Web Title: marathi actress Pranjal Ambavane thipkyanchi rangoli fame on New York Times Square Screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.