VIDEO :  हे करायला प्रामाणिक भक्ती लागते ताई...!  प्राजक्ताने पुन्हा उचलली 42 किलोंची खंडा तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:56 PM2021-12-27T12:56:02+5:302021-12-27T12:57:48+5:30

Prajakta Gaikwad at Jejuri : उचलून खंडा तलवार...  येळकोट येळकोट जय मल्हार, प्राजक्ता गायकवाडने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं, पाहा व्हिडीओ

marathi actress Prajakta Gaikwad at jejuri once again lifts 42 kg lord khandoba khanda talwar | VIDEO :  हे करायला प्रामाणिक भक्ती लागते ताई...!  प्राजक्ताने पुन्हा उचलली 42 किलोंची खंडा तलवार

VIDEO :  हे करायला प्रामाणिक भक्ती लागते ताई...!  प्राजक्ताने पुन्हा उचलली 42 किलोंची खंडा तलवार

googlenewsNext

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड  (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे ती तिच्या पोस्टमुळे. होय, प्राजक्ताचे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  प्राजक्ता पुन्हा एकदा जेजुरीला गेली होती. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात तिने खंडोबांचं दर्शन घेतलं. जेजुरी गडावरील फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Prajakta Gaikwad at Jejuri )

खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार प्राजक्ताने उचलली आणि सदानंदाचा येळकोट... येळकोट जय मल्हारचा एकच जयघोष झाला. याचे काही फोटो व व्हिडीओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साहजिकच प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. खरंच हे करायला प्रामाणिक भक्ती लागते, ताई तुमच्या धाडसाला तोड नाही, अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिली. मराठमोळी वाघिण, जिजाबाईंची लेक अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी दिल्या.

गतवर्षीही प्राजक्ताने खंडेरायाच्या जेजुरीचं दर्शन घेत, 42 किलोंची खंडा तलवार लिलया उचलली होती.

प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय.
दरम्यान, सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे ही मालिका चर्चेत होती. प्राजक्ताच्या उद्धटपणा आणि आडमुठेपणामुळेच तिला मालिकेतून काढून टाकले असे अलका कुबल यांनी सांगितले होते. पण प्राजक्ताने देखील त्यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले.

Web Title: marathi actress Prajakta Gaikwad at jejuri once again lifts 42 kg lord khandoba khanda talwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.