प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई! हातात भरल्या हिरवा बांगड्या, म्हणते- "पहिल्यांदाच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:26 IST2025-10-14T17:26:34+5:302025-10-14T17:26:54+5:30
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला. आता प्राजक्ताची लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरीही तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसत आहे.

प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई! हातात भरल्या हिरवा बांगड्या, म्हणते- "पहिल्यांदाच..."
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला. आता प्राजक्ताची लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरीही तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसत आहे.
नुकतंच प्राजक्ता तुळजापूरला गेली होती. तिथे प्राजक्ताने तुळजापूरच्या हिरव्या बांगड्या हातात भरल्या. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता हातात हिरव्या बांगड्या भरताना दिसत आहे. "पाहिल्यांदाच तुळजापूरला बांगड्या घातल्या…", असं कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडीओला दिलं आहे. प्राजक्ताने तुळजापूरच्या हिरव्या बांगड्या तर हातात भरल्या. पण, लवकरच लग्नाचा हिरवा चुडादेखील तिच्या हातात दिसणार आहे.
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही शंभुराज खुटवड असं आहे. ७ ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला. तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा लग्नसोहळा येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.