मिनाक्षी राठोडची लेक शिकतीये नवनवीन गोष्टी; अभिनेत्रीने शेअर केला क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:01 PM2022-07-25T16:01:21+5:302022-07-25T16:02:17+5:30

Meenakshi Rathod: बऱ्याचदा आपले ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करुन चर्चेत येणारी मिनाक्षी सध्या तिच्या बाळामुळे चर्चेत येत आहे.

marathi actress Meenakshi Rathod share her baby cute photo | मिनाक्षी राठोडची लेक शिकतीये नवनवीन गोष्टी; अभिनेत्रीने शेअर केला क्युट फोटो

मिनाक्षी राठोडची लेक शिकतीये नवनवीन गोष्टी; अभिनेत्रीने शेअर केला क्युट फोटो

googlenewsNext

'सुख म्हणजे नक्की काय असतं'  (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी राठोड (Meenakshi Rathod). काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या तिने काही काळासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

बऱ्याचदा आपले ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करुन चर्चेत येणारी मिनाक्षी सध्या तिच्या बाळामुळे चर्चेत येत आहे. मिनाक्षी वरचेवर तिच्या बाळाचे काही मजेदार किस्से, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
अलिकडेच मिनाक्षीने तिच्या बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं बाळ झोक्यात बसलं असून त्याने झोक्याची दोरी हाताने घट्ट पकडली आहे. हा गोड क्षण तिने शेअर करत आपलं बाळ नवनवीन गोष्टी कशा प्रकारे शिकतंय हे सांगायचा प्रयत्न केला आहे.

"आम्ही मान धरली, झोक्यात पण बसलो. आणि, विशेष म्हणजे दोरी पण स्वत: पकडली", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. मिनाक्षी आणि तिचा पती कैलास वाघमारे काही महिन्यांपूर्वीचे आई-बाबा झाले आहेत.
दरम्यान, मीनाक्षीने 2018 मध्ये ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमधून टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 2020 मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. मीनाक्षीने अनेक लघुपटांमध्ये काम केलंय.
 

Web Title: marathi actress Meenakshi Rathod share her baby cute photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.