'..झाली माझी दैना'! प्रदीपला कंटाळली मानसी? पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:45 PM2022-07-12T17:45:10+5:302022-07-12T17:45:45+5:30

Mansi naik: सोशल मीडियावर मानसी कमालीची सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने प्रदीपसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actress mansi naik shared video with husband pradeep kharera | '..झाली माझी दैना'! प्रदीपला कंटाळली मानसी? पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडीओ

'..झाली माझी दैना'! प्रदीपला कंटाळली मानसी? पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडीओ

googlenewsNext

 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi naik). अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते. यात बऱ्याचदा ती तिच्या पतीसोबत म्हणजेच प्रदीप खरेरासोबत (Pradip Kharera) व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत असते. मराठी कलाविश्वातील ऐश्वर्या राय अशी ओळख मिळवणाऱ्या मानसीने अलिकडेच प्रदीपसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर मानसी कमालीची सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने प्रदीपसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसंच या व्हिडीओच्या बँकग्राऊंडला प्ले होत असलेलं गाणं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

'खंडेराया झाली माझी दैना रे...' हे गाणं व्हिडीओच्या बँकग्राऊंडला सुरु असल्याचं ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे मानसीप्रमाणेच आता प्रदीपही सहज कॅमेरा फेसिंग करत असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतं. त्यामुळेच या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप आहे. प्रदीप मुळचा हरियाणाचा असून मानसीने मध्यंतरी तिच्या सासरे फोटोही शेअर केले होते.
 

Web Title: marathi actress mansi naik shared video with husband pradeep kharera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.