"गिरीजाचा गाल धरला अन्...", माधवी निमकरने सांगितला मालिकेच्या सेटवर घडलेला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:11 IST2025-08-28T17:03:59+5:302025-08-28T17:11:01+5:30

"माझ्यामुळे गिरीजाला...", माधवी निमकरने सांगितला 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या सेटवर घडलेला 'तो' प्रसंग, म्हणाली...

marathi actress madhavi nimkar recounted that incident that happened on the sets of sukh mhanje nakki kay ast serial | "गिरीजाचा गाल धरला अन्...", माधवी निमकरने सांगितला मालिकेच्या सेटवर घडलेला 'तो' प्रसंग

"गिरीजाचा गाल धरला अन्...", माधवी निमकरने सांगितला मालिकेच्या सेटवर घडलेला 'तो' प्रसंग

Madhavi Nimkar: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माधवी निमकर. 'स्वप्नांच्या पलीकडले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' यांसारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.आपल्या दमदार अभिनयाने तिने टीव्ही इंडस्ट्रीत आपली एक वेगळीच छाप उमटवली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत तिन साकारलेली शालिनी आजही मालिका रसिकांच्या स्मरणात आहे. सध्या माधवी तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' च्या सेटवर गिरीजा प्रभूसोबत घडलेला प्रसंग शेअर केला. 

नुकतीच माधवी निमकरने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यासह प्रोफेशनल आयुष्यावरही भाष्य केलं. त्यावेळी सुख म्हणजे नक्की काय असतं च्या मालिकेच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी माधवी म्हणाली, "एकदा असंच सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेचे पहिलेच एपिसोड सुरु होते. तेव्हा मी गिरीजाचा गाल धरला नेमकं तेव्हा ती लग्नाच्या गेटअपमध्ये होती. त्यावेळी तिने झुमके घातले होते,त्या झुमक्याची जी दांडी ती तिला रुतली. तो सीन करताना नेमकं ते डुल हातात आल्याने तिच्या कानाला लागलं.ते इतकं लागलं होतं की तिचा चेहरा लाल झाला होता. मला वाटलं की, सीनसाठी खरोखरं गिरीजाच्या डोळ्यात पाणी येत असेल, अशी शंका मला होती."

पुढे माधवी निमकरने सांगितलं, "तो सीन कट झाल्यानंतर ती रडायला लागली. मला वाटलंच की आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे. तर तिला म्हटलं काय झालं, काही लागलं का तुला? असं विचारल्यानंतर ती बिचारी नाही म्हणाली. पण, मी पाहिलं तर ती दांडी तिला खूपच लागली होती. मी तिला मिठी मारली, रडायला लागले आणि माफी मागितली. म्हटलं मी असं मुद्दाम केलं नाही. तेव्हा ती म्हणाली, ताई ठीक आहे तू का रडतेस.त्यादरम्यान सेटवर  आमचे दिग्दर्शक होते ते म्हणाले, शालिनी तू शालिनी आहेस.मी म्हटलं अहो, सर थांबा मला खरंच वाईट वाटतंय." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

Web Title: marathi actress madhavi nimkar recounted that incident that happened on the sets of sukh mhanje nakki kay ast serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.