कास्टिंग झालं अन् अचानक मालिकेतून बाहेर काढलं! 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील भयाण वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:32 IST2025-10-13T18:30:18+5:302025-10-13T18:32:18+5:30
'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव, म्हणाली...

कास्टिंग झालं अन् अचानक मालिकेतून बाहेर काढलं! 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील भयाण वास्तव
Sanyogeeta Bhave: संयोगिता भावे या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली.संयोगिता भावे आजवर अनेक मालिकांमधून खलनायिकेच्या भूमिकेतून आपल्या भेटीला आल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत वसू आत्या नावाचं खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. नुकतीच संयोगिता भावे यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी अभिनय क्षेत्रातीला काही चांगले-वाईट अनुभव शेअर केले. तेव्हा संयोगिता म्हणाला, "एका मालिकेसाठी माझं कास्टिंग झालं, मी सेटवर गेल्यानंतर तयार झाले. पण तेव्हा माझा कॉस्च्यूम आला नव्हता. त्यासाठी मी एक-दोन तास वाट बघत बसले होते. तो शूटचा पहिलाच दिवस होता. मग मी विचारलं तर ते म्हणाले, 'तुम्हाला कास्ट करण्यासाठी एका अभिनेत्रीसोबत आमचं बोलणं चालू होतं. त्या आता आल्या आहेत तर तुम्ही घरी जा. त्याचं ते बोलणं ऐकून मी ढसाढसा रडायला लागले."
यापुढे संयोगिता यांनी म्हटलं, "माझं म्हणणंच हेच होतं की, मग तुम्ही मला का बोलवलंत. तिची डेट मिळेपर्यंत तुम्ही वाट पाहणं गरजेचं होतं. शिवाय त्या अभिनेत्रीला मी ओळखत होते कारण आम्ही एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. तर ती म्हणाली हो, पण मी आता इथे आलेय आणि मीच ते करणार. त्याच्यानंतर मी घरी गेले. " असा वाईट अनुभव त्यांना हिंदी मालिकेच्या सेटवर आला होता.