"आठव्या महिन्यापर्यंत मी शूट केलं", कविता लाड यांनी सांगितला 'चार दिवस सासूचे'चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:43 IST2025-06-13T13:43:07+5:302025-06-13T13:43:47+5:30

१०० दिवसांच्या एपिसोड्सची बँक केली, कविता लाड यांनी सांगितला अनुभव

marathi actress kavita lad medhekar shared chaar divas sasuche shooting experience | "आठव्या महिन्यापर्यंत मी शूट केलं", कविता लाड यांनी सांगितला 'चार दिवस सासूचे'चा अनुभव

"आठव्या महिन्यापर्यंत मी शूट केलं", कविता लाड यांनी सांगितला 'चार दिवस सासूचे'चा अनुभव

'चार दिवस सासूचे' मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad). त्यांनी अनेक नाटक, मालिका गाजवल्या आहेत. नुकतीच त्यांची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका संपली. यामध्ये त्या भुवनेश्वरीच्या भूमिकेत दिसल्या. शिवाय त्यांचं 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकही सुरु आहे. दरम्यान एका मुलाखतीत कविता लाड यांनी 'चार दिवस सासूचे'च्या सेटवरचा एक किस्सा सांगितला.

'लोकशाही'ला दिलेल्या मुलाखतीत कविता लाड म्हणाल्या, "चार दिवस सासू'चे प्रोडक्शन हाऊस अत्यंत शिस्तबद्ध होते. एकदा तारखा दिल्या की त्यात बदल नाही. त्याप्रमाणे शूटिंग शेड्युल लागायचं. आम्ही वेळेत पोहोचायचो, शूट करायचो आणि वेळेतच निघायचो. मी इतके हजारो एपिसोड्स शूट केले पण त्यात कधीच रात्री शूट केलं नाही."

त्या पुढे म्हणाल्या, "मी गरोदर असताना मी मालिका सोडते असं म्हटलं होतं. पण त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव मांडला की आम्ही तुला मॅटर्निटी लीव्ह देऊ. तीन महिन्यांची सुट्टी देऊ. हे कसं शक्य होणार? असा मला प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी १०० एपिसोड्स बँक केले. आठव्या महिन्यापर्यंत मी शूटिंग केलं. तीन महिने त्यांनी मला सुट्टी दिली. नंतर मी म्हटलं आता बाळ झाल्यावर मला लगेच शूटला येता येणार नाही. ब्रेस्ट फीडिंग करायचं,  त्याची काळजी घ्यायची हे कसं जमणार? मला बाळ सहा महिने माझ्यासोबत हवं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाळालाही सेटवर घेऊन या. आम्ही तुम्हाला स्वतंत्र खोली देतो. माझी आई माझ्यासोबत यायची. सात-महिन्यापर्यंत मी ईशानला सेटवर नेलं आहे. तर हे असं प्रोडक्शन हाऊस आणि कलाकार दोघांमध्ये सहकार्य असायचं."

Web Title: marathi actress kavita lad medhekar shared chaar divas sasuche shooting experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.