Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं नवऱ्याच्या सांगण्यावरून ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडली? वाचा, अभिनेत्री काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:25 AM2022-07-17T10:25:43+5:302022-07-17T10:25:53+5:30

Hruta Durgule: सलग दोन मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यामुळे हृताला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. हृताने पती प्रतिक शाह याच्या सांगण्यावरून हे दोन मोठे प्रोजेक्ट सोडल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे...

marathi actress Hruta Durgule husband get troll after she left Man Udu Udu Zhala | Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं नवऱ्याच्या सांगण्यावरून ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडली? वाचा, अभिनेत्री काय म्हणाली

Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं नवऱ्याच्या सांगण्यावरून ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडली? वाचा, अभिनेत्री काय म्हणाली

googlenewsNext

अभिनेत्री हृता दुगुर्ळे (Hruta Durgule ) सध्या जाम चर्चेत आहेत. ‘अनन्या’पाठोपाठ हृताचा ‘टाईमपास 3’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सिनेमांत प्रचंड बिझी होताच हृताने काही प्रोजेक्टला रामराम ठोकला आहे. विविध प्रोजेक्ट सोडल्यामुळे सध्या हृताला ट्रोल केलं जात आहे. हृताची ‘मन उडू उडू झालं’ ( Man Udu Udu Zhala) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोबतच हृताने ‘दादा एक गुडन्यूज’ हे नाटकही सोडलं आहे. सलग दोन मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यामुळे हृताला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली होती. हृताने पती प्रतिक शाह (Hruta Durgule and Prateek Shah) याच्या सांगण्यावरून हे दोन मोठे प्रोजेक्ट सोडल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला होता. आता या सगळ्यावर हृता रिअ‍ॅक्ट झाली आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये वारंवार नवऱ्याचं नाव घेतलं जात असल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली आहे.


 
काय म्हणाली हृता?

 मला मुळातच ट्रोलिंग हा प्रकार आवडत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर भरभरून प्रेम करता त्याच्याबद्दल केवळ एखादी गोष्ट वाचून तुम्ही कसे व्यक्त होता?  सत्य माहित नसताना एखाद्याला ट्रोल करणं हे चांगलं नाही. काहीच दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ बंद होणार असल्याचं समोर आलं. त्यानंतर मी ‘दादा एक गुड न्यूज’ या नाटकामध्ये सुद्धा  नसेन याबद्दलची बातमी सुद्धा सगळ्यांना समजली. यानंतर लोकांनी मला ट्रोल करायला सुरूवात केली. माझ्या नवऱ्याने सांगितलं मी म्हणून मी प्रोजेक्ट सोडतेय, असं काय काय लोक म्हणाले. पण मी सांगू इच्छिते की, असं काहीही नाही.

माझा नवरा प्रतिक माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आहे, हे खरं आहे. पण म्हणून तो माझे निर्णय घेत नाही. गेली दहा वर्ष मी अपार कष्ट घेत माझं करिअर घडवलं आहे. त्यामुळे सरसकट असा काहीही निष्कर्ष काढण्याआधी चाहत्यांनी विचार करायला हवा. माझा चाहतावर्ग असंवेदनशील असावा, असं मला वाटत नाही, असं हृता म्हणाली.
 हृता व प्रतिक यांनी गेल्या 18 मे रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या  लग्नावरून सुद्धा हृताला बऱ्याच नकारात्मक कमेंट्सना सामोरं जावं लागलं होतं.  

Web Title: marathi actress Hruta Durgule husband get troll after she left Man Udu Udu Zhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.