गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोळ्यावर गॉगल अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? म्हणते, "आयुष्य जेव्हा.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 13:11 IST2023-10-26T13:11:24+5:302023-10-26T13:11:55+5:30
मराठी अभिनेत्रीचा हटके लूक, फोटो पाहून ओळखणंही झालं कठीण

गळ्यात रुद्राक्षाची माळ, डोळ्यावर गॉगल अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? म्हणते, "आयुष्य जेव्हा.."
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम करून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. अभिनयाबरोबरच ती स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. अनेकदा हेमांगी तिचं मत अगदी परखडपणे व्यक्त करताना दिसते. हेमांगी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल हेमांगी चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते.
नुकतंच हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने हटके लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि डोळ्यावर गॉगल लावलेल्या हेमांगीला फोटोत ओळखणंही कठीण झालं आहे. या फोटोला हेमांगीने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "जेव्हा आयुष्यच नशा असते आणि तुम्हाला याची सवय लागून जाते", असं हेमांगीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
हेमांगी सध्या तिच्या कामात व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत काम करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याआधी हेमांगी क्रिकेटर युवराज सिंहबरोबरही जाहिरातीत झळकली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ताली' आणि 'दो गुब्बारे' या वेब सीरिजमध्ये हेमांगी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली.