नाही जमलं तुम्हाला, तुम्हाला हे शोभत नाही..., वहिनीसाहेब का झाल्यात ट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:33 PM2022-01-07T17:33:16+5:302022-01-07T17:34:51+5:30

Dhanashri Kadgavkar : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी म्हणजे एकदम कडक पात्र. मालिका संपली पण वहिनी साहेबांना अद्याप प्रेक्षक विसरलेले नाहीत. या वहिनीसाहेब कोण तर अभिनेत्री धनश्री काडगावकर.

marathi actress dhanashri kadgaonkar share dance video get troll | नाही जमलं तुम्हाला, तुम्हाला हे शोभत नाही..., वहिनीसाहेब का झाल्यात ट्रोल?

नाही जमलं तुम्हाला, तुम्हाला हे शोभत नाही..., वहिनीसाहेब का झाल्यात ट्रोल?

googlenewsNext

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी म्हणजे एकदम कडक पात्र. मालिका संपली पण वहिनी साहेबांना अद्याप प्रेक्षक विसरलेले नाहीत. या वहिनीसाहेब कोण तर अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgavkar). 

‘तुझ्यात जीव रंगला’  या मालिकेत धनश्रीने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. धनश्रीने काही महिन्यांपूर्वीच बाळाला जन्म दिला. तूर्तास धनश्रीचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काहींनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. पण काही जण या व्हिडीओवरून धनश्रीला ट्रोल करत आहेत.

जीन्स आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान करून धनश्री या व्हिडीओत धमाकेदार डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओवर नेटकर्‍यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी धनश्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून लईभारी, कडक,  किती बारीक झालात, अशा कमेंट्स केल्या आहेत.

पण काहींनी याच व्हिडीओवरून धनश्रीला ट्रोल केलं आहे. ‘नाही जमलं तुम्हाला, तुम्हाला हे शोभत नाही,’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका युजरने ‘काय वहिनी कसला डान्स आहे तुमचा, सुपर से बहुत ऊपर’, अशी कमेंट केली आहे. तर अन्य एकाने गप्प बस धनश्री, अशा शब्दांत वहिनीसाहेबांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रेग्नंसी काळात धनश्रीला वाढलेल्या वजनावरून प्रचंड ट्रोल केलं होतं. तुझा फुटबॉल झालाये, अशा आशयाच्या कमेंट्स ट्रोलर्सनी केल्या होत्या. या ट्रोलर्सला धनश्रीने खरमरीत उत्तर दिलं होतं.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीनं लग्नगाठ बांधली होती.  ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत धनश्रीला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.    

Web Title: marathi actress dhanashri kadgaonkar share dance video get troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.