धनश्रीला पाठिंबा देणाऱ्या तिच्या सासऱ्यांना कधी पाहिलंय का? फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:32 AM2023-10-02T11:32:52+5:302023-10-02T11:33:22+5:30

Dhanashri kadgaonkar: पाहा धनश्रीच्या सासरची माणसं

marathi actress dhanashri kadgaonkar father in-laws photo is going viral | धनश्रीला पाठिंबा देणाऱ्या तिच्या सासऱ्यांना कधी पाहिलंय का? फोटो होतोय व्हायरल

धनश्रीला पाठिंबा देणाऱ्या तिच्या सासऱ्यांना कधी पाहिलंय का? फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब अर्थात धनश्री काडगांवकर (dhanashri kadgaonkar) हे नाव कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळलेली धनश्री सध्या 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  विशेष म्हणजे गेल्या कित्येक काळापासून धनश्री कलाविश्वात सक्रीय आहे. धनश्रीचं लग्न झालं असून तिला एक कबीर हा चिमुकला मुलगादेखील आहे. मात्र, घरसंसार आणि करिअर याची गाडी ती उत्तमरित्या सांभाळत आहे. परंतु, तारेवरची ही कसरत करत असताना तिला तिच्या कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे तिला पाठिंबा देणारे तिचे सासरे कोण ते पाहुयात.

धनश्रीने २०१३ साली ध्रुवेश देशमुख सोबत लग्न केलं असून ध्रुवेश व्यवसायाने इंजिनिअर आहे. धनश्री आणि ध्रुवेश दोघंही मूळचे पुण्याचे आहेत. त्यामुळे आजही ते पुण्यातच राहतात. यात बऱ्याचदा धनश्रीला शुटिंगसाठी मुंबई-पुणे असा प्रवास करावा लागतो. परंतु, धनश्रीला तिच्या कुटुंबाकडून खासकरुन सासरच्या मंडळींकडून मोठा पाठिंबा असल्याचं म्हटलं जातं.

काही दिवसांपूर्वीच ध्रुवेशने त्याच्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे ध्रुवेशच्या वडिलांचा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. सोबतच धनश्रीचे सासरेबुवा असं म्हणत अनेकांनी तो फोटो व्हायरलही केला आहे.
 

Web Title: marathi actress dhanashri kadgaonkar father in-laws photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.