‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:16 PM2022-05-26T18:16:18+5:302022-05-26T18:17:26+5:30

Apurva Nemlekar : ‘शेवंता’ म्हटलं की एक चेहरा हटकून डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा. सध्या शेवंता काय करतेय? तर दुबई एका खास व्यक्तिसोबत सुट्टी एन्जॉय करतेय.

marathi actress Apurva Nemlekar is on dubai vacation share photos | ‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो

‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो

googlenewsNext

‘शेवंता’ म्हटलं की एक चेहरा हटकून डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिचा. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताची भूमिका साकारून अपूर्वा घराघरात पोहोचली. या पात्रानं तिला एक नवी ओळख दिली. अगदी लोक तिला शेवंता म्हणूनच ओळखू लागले.  अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’चा कधीच रामराम ठोकलाये. पण अद्यापही तिने साकारलेली शेवंता प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. सध्या ही शेवंता काय करतेय? तर दुबई एका खास व्यक्तिसोबत सुट्टी एन्जॉय करतेय. ही खास व्यक्ति कोण तर तिची आई. होय, आईसोबत अपूर्वा दुबई वारी करतेय.

अपूर्वा  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.  सध्या तिने दुबई व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहे. आईला घेऊन ती दुबईत गेली आहे. आईसोबतचे दुबईतील भटकंतीचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. अगदी विमानात बसल्यापासून ते प्रत्येक ठिकाणचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. 

अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. पण ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून तिला प्रचंड पसंती मिळाली. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले होते. अपूर्वा र्सद्धा रसिकांची तितकीच आवडती अभिनेत्री बनली होती. तिने साकारलेल्या शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला होता.  

 

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत झळकण्याआधी अपूर्वाने आपल्या व्यवसायाची सुरवात केली होती.आर्टिफिशिअल ज्वेलरी आणि साड्यांचा ती व्यवसाय करते. सातारा  येथे अपूर्वा कलेक्शन नावाने तिचा हा व्यवसाय प्रसिद्ध आहे.  

Web Title: marathi actress Apurva Nemlekar is on dubai vacation share photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.