लग्नानंतर अडीच वर्षांनी मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी शॉवरचा व्हिडिओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:37 IST2025-03-05T15:37:17+5:302025-03-05T15:37:54+5:30
सोशल मीडियावर गोड व्हिडिओ शेअर करत अमृताने तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगितलं होतं. आता अभिनेत्रीने डोहाळेजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

लग्नानंतर अडीच वर्षांनी मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी शॉवरचा व्हिडिओ केला शेअर
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अभिनेत्री अमृता पवार लवकरच आई होणार आहे. अमृताने काही दिवसांपूर्वीच ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर गोड व्हिडिओ शेअर करत अमृताने तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं सांगितलं होतं. आता अभिनेत्रीने डोहाळेजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अमृताचं नुकतंच बेबी शॉवर पार पडलं. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसून फुलांची ज्वेलरी परिधान केल्याचं दिसत आहे. अमृताच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे.
अमृताने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेतही ती दिसली होती. २०२२ मध्ये तिने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता ते आईबाबा होणार असल्याने आनंदी आहेत.