चिंब भिजलेल्या साडीत ऐश्वर्या नारकरने दिली किलर पोझ; त्यांच्या बोल्डनेस पुढे अनेक अभिनेत्रीही होतायेत फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:06 IST2023-03-10T18:01:00+5:302023-03-10T18:06:21+5:30
Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांनी लाल रंगाच्या साडीत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्या चिंब भिजलेल्या दिसत आहेत.

चिंब भिजलेल्या साडीत ऐश्वर्या नारकरने दिली किलर पोझ; त्यांच्या बोल्डनेस पुढे अनेक अभिनेत्रीही होतायेत फेल
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). वय हा केवळ आकडा आहे हे ऐश्वर्या यांच्याकडे पाहून लक्षात येतं. आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्या कमालीच्या ग्लॅमरस दिसत आहेत.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांचा दांडगा वावर आहे. त्यामुळे वरचेवर त्या फोटोशूट करुन त्यातील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. मात्र, यावेळी त्यांचा फोटो चर्चेसह व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी लाल रंगाच्या साडीत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्या चिंब भिजलेल्या दिसत आहेत. सोबतच त्यांनी क्लासिक पोझही दिली आहे. त्यामुळे चाहत्यांसह सेलिब्रिटीही त्यांच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.