सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:41 IST2023-03-16T17:40:39+5:302023-03-16T17:41:08+5:30
Suyash Tilak: राणादाच्या भावासोबत सुयश शेअर करणार स्क्रीन

सुयश टिळक पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; राणादाच्या भावासोबत शेअर करणार स्क्रीन
छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या मालिकांच्या गर्दीत काही मालिका त्यांचं वेगळेपण जपत असतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'जिवाची होतीया काहिली' (jivachi hotiya kahile). या मालिकेत मराठी आणि कानडी अशा दोघांची प्रेमकथा दाखवण्यात येत आहे. अभिनेता राज हंचनाळे याची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आता अभिनेता सुयश टिळकची एन्ट्री झाली आहे.
मराठमोळा रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी विशेष लोकप्रिय ठरत आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे. परंतु, आता त्यांच्या प्रेमात कार्तिक देवराज याचा अडथळा येणार आहे. कार्तिकची ही नकारात्मक भूमिका अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) साकारणार आहे.
कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत असून अशा प्रकारची भूमिका सुयशने यापूर्वी कधीही केली नाही. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री आहे. मात्र, तरीदेखील तो पण रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.