"मरणाच्या क्षणी आयुष्यातील सर्वात जवळच्या...", सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 06:59 PM2023-08-01T18:59:55+5:302023-08-01T19:00:15+5:30

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत

marathi actor suvrat joshi shared dil dosti duniyadari post goes viral | "मरणाच्या क्षणी आयुष्यातील सर्वात जवळच्या...", सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

"मरणाच्या क्षणी आयुष्यातील सर्वात जवळच्या...", सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

googlenewsNext

सुव्रत जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सुव्रतने मोठ्या पडद्यावरही जादू दाखवली. झी वाहिनीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सुव्रत घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने सुजयची भूमिका साकारली होती. सुव्रतने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. 

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत सहा मित्रांची गोष्ट दाखविण्यात आली होती. नुकतीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या टीमने हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमातील काही फोटो सुव्रतने त्याच्या फेसबुकवरुन शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "असे म्हणतात की मरण्याच्या क्षणी आयुष्यातील सर्वात जवळच्या काही आठवणी डोळ्यासमोरून सरकतात... त्या धावत्या रीळामध्ये "दिल दोस्ती दुनियादारी" च्या दिवसांच्या प्रतिमा ठळक असतील...", असं कॅप्शन सुव्रतने या फोटोंना दिलं आहे.

बांगलादेशी मुलावर होतं मानसी नाईकचं क्रश, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

कंगनाला 'ओपेनहायमर'चं कौतुक, इंटीमेट सीन आणि भगवद्गीता वाचनाच्या दृश्यांबद्दल म्हणाली...

सुव्रतने 'IB 71', 'शी सीझन २' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. सुश्मिता सेनच्या ताली या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या सुव्रतने २०१९ साली अभिनेत्री सखी गोखलेबरोबर लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सुव्रत आणि सखी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Web Title: marathi actor suvrat joshi shared dil dosti duniyadari post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.