"अजून सांगतोय नारळ द्या.."; MI हरल्यावर मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:50 AM2024-04-15T08:50:01+5:302024-04-15T08:51:34+5:30

मुंबई इंडियन्सला काल चेन्नईविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे मराठमोळा अभिनेता सौरभ चौगुलेने हार्दिक पंड्यावर निशाणा साधलाय (mumbai indians, csk, saorabh choughule)

Marathi actor saorabh choughule slam Hardik Pandya after MI lost against csk ipl 2024 | "अजून सांगतोय नारळ द्या.."; MI हरल्यावर मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला

"अजून सांगतोय नारळ द्या.."; MI हरल्यावर मराठमोळ्या अभिनेत्याचा हार्दिक पंड्याला टोला

काल IPL मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगला. शेवटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सला २० धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या रोहित शर्माने शतक झळकावलं असलं तरीही त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याने २० वं षटक टाकलेलं त्यात चेन्नई सुपर किंग्जमार्फत महेंद्र सिंग धोनीने २० धावा कुटल्या. याच २० धावांमुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. यामुळे मराठमोळा अभिनेता सौरभ चौगुलेने हार्दिक पंड्याला चांगलाच टोला लगावलेला दिसतोय.

अभिनेता सौरभ चौगुलेने हार्दिक पंड्याचं नाव न घेता लिहिलंय की, "शेवटी त्याच २० रन्सने हरलो.. अजून पण सांगतोय नारळ द्या..." असं सौरभ म्हणाला. दुसरीकडे हार्दिक पंड्याने ओव्हरमध्ये वाईड बॉलसाठी रिव्ह्यू मागितले होते. पण हे रिव्ह्यू अपयशी ठरले. त्यावर निशाणा साधत सौरभ पुढे लिहितो, "बॅटला बॉल लागला नाही तर वाईड आहे, वाईड आहे असं ओरडायचो लहानपणी. तसंच काहीसं वाटलं जेव्हा त्याने रिव्ह्यू घेतला."

अशाप्रकारे मुंबई इंडियन्स हरल्याचा चांगलाच राग सौरभने हार्दिक पंड्यावर काढलेला दिसतोय. सौरभ बद्दल सांगायचं तर.. 'जीव माझा गुंतला' मालिकेतून सौरभ घराघरात लोकप्रिय झाला. याच मालिकेतील त्याची सहकलाकार अभिनेत्री योगिता चव्हाणसोबत सौरभने काहीच दिवसांपुर्वी लग्न केलं. सौरभ सध्या सन मराठीवरील 'सुंदरी' मालिकेत झळकत आहे.

Web Title: Marathi actor saorabh choughule slam Hardik Pandya after MI lost against csk ipl 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.