गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, "त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:15 PM2023-11-07T12:15:21+5:302023-11-07T12:15:35+5:30

मराठी अभिनेत्याला अमेरिकेतील प्रयोगानंतर तेथील चाहत्याने अमेरिकन डॉलर्स भेट म्हणून दिले होते.

marathi actor rohan gujar shared his aamne samne natak america tour experience | गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, "त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्..."

गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, "त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्..."

अनेक मालिका आणि नाटकांमधून अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता म्हणजे मोहन गुजर.  'बन मस्का', 'लव्ह लग्न लोचा', 'सांग तू आहेस का?' अशा लोकप्रिय मालिकांमधून रोहन महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत त्याने साकारलेली पिंट्या ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेमुळे रोहन घराघरात पोहोचला. रोहन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. 

आगामी प्रोजेक्टबद्दल पोस्टद्वारे तो चाहत्यांना माहिती देत असतो. मालिकांमुळे लोकप्रियता मिळवलेल्या रोहनने नाटकांमध्येही काम केलं आहे. 'आमने सामने' नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेला गेलेल्या रोहनला त्याच्या चाहत्याकडून अमेरिकन डॉलर्स भेट म्हणून मिळाले होते. रंगभूमीदिनानिमित्त रोहनने याबाबत खास पोस्ट शेअर केली होती. 

रोहन गुजरची इन्स्टाग्राम पोस्ट

गोष्ट काही डॉलर्सची !

अमेरिकेचा प्रयोग संपल्या नंतर प्रेक्षकांमधल कुणीतरी येत तुम्हाला घट्ट मिठी मारतं तुम्हाला अंदाज येतो ह्या मिठीतली उर्जा वेगळी आहे, मिठीतून बाहेर येता येता तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यातंल पाणी दिसतं… तुमचं काम आवडल्याचं ती व्यक्ती तुम्हाला सांगते आणि पुढल्याच क्षणी काही डॉलर्स काढून हातावर ठेवते…
“तुम्हाला माझं काम आवडलं मला ह्यातच समाधान”, माझं वाक्य. मी डॉलर्स पुन्हा त्यांच्या हातात ठेवतो… ती व्यक्ती दोन्ही हातांनी पुन्हा ते डॉलर्स माझ्या हातात दाबून धरते…“मला व्यक्त होता येत नाहीये पण ह्याला नाही म्हणू नका… “ ती व्यक्ती माझ्या नकाराचा उद्गार येणार हे जाणून मुळ्ये मामा “ते प्रेमाने देतायत नाही म्हणू नकोस… “ त्या व्यक्तीनं माझा हात अजूनही डॉलर्स सकट दाबून धरलेला…. “ठिके” माझ्या तोंडून एवढच बाहेर पडत… ती व्यक्ती मला पुन्हा एकदा मिठी मारून मला काही क्षण बघत निघून जाते…हातात चुरघळेले डॉलर्स तसेच…

दुसऱ्या दिवशी पहाटेचं फ्लाईट पुढच्या प्रयोगासाठीचं म्हणून मी बॅग भरतो आवरून थोडस जेवून घेतो, झोपायला म्हणून बेड वर बसतो आणि डोळ्याच्या कडा ओल्या जाणवतात. ते डॉलर्स तसेच ट्रॅक पँट च्या खिशात ठेऊन झोपून जातो…

तो दुसरा दिवस ते थेट आज… एक प्रश्न मनात घोळत राहिलाय… डोळ्यात पाणी नेमक कशामुळे आलं ? असो….'आमने सामने' माझं पहिलं व्यावसायिक नाटक...शाबासकी बऱ्याच जणांकडून मिळाली पण सातासमुद्रा पार मिळालेल्या पहिल्या वहिल्या डॉलर्सची ही गोष्ट!!

रोहन सन मराठीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याबरोबरच 'आरे ला कारे' या नाटकातूनही तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. रोहनने मालिका आणि नाटकांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

Web Title: marathi actor rohan gujar shared his aamne samne natak america tour experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.