'मुरांबा' मालिकेत आशय कुलकर्णीची एन्ट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:34 PM2024-03-26T16:34:40+5:302024-03-26T16:35:08+5:30

'मुरांबा' मालिकेला नवं वळण, आशय कुलकर्णी पुन्हा दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

marathi actor ashay kulkarni to play important role in muramba tv serial | 'मुरांबा' मालिकेत आशय कुलकर्णीची एन्ट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

'मुरांबा' मालिकेत आशय कुलकर्णीची एन्ट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'मुरांबा'. शशांक केतकर आणि शिवानी मुंधेकर मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. अशातच या मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 'मुरांबा' मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता आशय कुलकर्णी लवकरच नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

'पाहिले न मी तुला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशय कुलकर्णी मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशय या मालिकेत अथर्व हे पात्र साकारताना दिसणार आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. "येतोय 'मुरांबा' घेऊन खळबळ करायला" असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आशय कुलकर्णीची मुरांबा मालिकेत एन्ट्री झाल्याने या मालिकेबाबत चाहत्यांची उत्सुकता आता वाढली आहे. आशयला मुरांबा मालिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 

दरम्यान, आशयने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'माझा होशील ना' या मालिकेतही तो झळकला होता. 'इंदोरी इश्क' या हिंदी मालिकेतही त्याने काम केलं आहे. 'एक थी बेगम' या वेब सीरिजमध्येही आशय महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'व्हिक्टोरिया' सिनेमातही त्याने मुख्य भूमिका साकारली होती. 

Web Title: marathi actor ashay kulkarni to play important role in muramba tv serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.