VIDEO: क्या बात! अक्षया-हार्दिकने सुरू केली नवी प्रथा, कुटुंबाने विणले ‘पाठकबाईं’च्या लग्नाच्या साडीचे धागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 17:19 IST2022-10-16T17:09:18+5:302022-10-16T17:19:35+5:30
Akshaya Deodhar & Hardeek Joshi : हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या केळवणाचे फोटो तुम्ही बघितले असतीलच. आता लग्नाच्या अन्य विधींचाही शुभारंभ झाला आहे. होय, विधींची सुरूवात झाली ती अक्षयाची लग्नाची साडी विणण्यापासून...

VIDEO: क्या बात! अक्षया-हार्दिकने सुरू केली नवी प्रथा, कुटुंबाने विणले ‘पाठकबाईं’च्या लग्नाच्या साडीचे धागे
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar ) एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची भणकही कुणाला लागू दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. तर लगीनघाई सुरू झाली आहे.
केळवणाचे फोटो तुम्ही बघितले असतीलच. आता लग्नाच्या अन्य विधींचाही शुभारंभ झाला आहे. होय, विधींची सुरूवात झाली ती अक्षयाची लग्नाची साडी विणण्यापासून. काल पुण्यात साडी विणणाऱ्या एका नामांकित कंपनीत अक्षयाच्या लग्नाची साडी विणायला घेतली गेली. या विधीला वधू-वरांकडील निवडक मंडळी उपस्थित होते.
वधू लग्नावेळी जी साडी नेसणार असते त्या साडीतील काही धागे नवरा मुलगा स्वत:च्या हातानं विणतो. मग तिचे कुटुंबीय, स्वत: होणारी वधूही साडीतील काही धागे विणते. या कार्यक्रमासाठी अक्षया आणि हार्दिकच्या घरातील मंडळी पुण्यात जमले होते. हार्दिकने अक्षयाच्या साडीतील काही धागे स्वत:च्या हातांनी विणले. पाठोपाठ देवधर आणि जोशी कुटुंबातील प्रमुख सदस्यही अक्षयाच्या साडीतील काही धागे विणताना दिसले. अभिनेत्री वीणा जगताप हिनेही दोन-दोन धागे विणले. वीणाने एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
अक्षया लग्नात जी साडी नेसणार आहे, ती हँडलूमची आहे. अक्षया आणि हार्दिक यांनी ३ मे रोजी साखरपुडा झाला. दोघांचेही साखरपुड्याचे सोशल मीडियावर दिसले आणि चाहत्यांना सुखद धक्का बसला. अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.