मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:21 IST2025-04-11T12:20:28+5:302025-04-11T12:21:09+5:30
एका मराठी अभिनेत्याच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये मराठी अभिनेत्याने मुलीसारखा लूक केल्याचं दिसत आहे.

मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?
सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये मराठी अभिनेत्याने मुलीसारखा लूक केल्याचं दिसत आहे. मुलींसारखा वन पीस घालून, मेकअप करून अभिनेत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
अभिनेत्यासोबत या व्हिडिओत त्याचे इतरही काही मित्र दिसत आहेत. त्यांनीदेखील मुलींसारखा वेष केला आहे. कुणी साडी नेसल्याचं दिसत आहे तर कोणी स्कर्ट आणि टॉप घातल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. खरं तर एका अॅक्टिंग वर्कशॉपसाठी एका हॉलिवूड अभिनेत्रीचा लूक अभिनेत्याने केला होता. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
व्हिडिओत दिसणारा हा मराठी अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अजिंक्य राऊत आहे. अजिंक्य हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. त्याने 'विठू माऊली', 'अबोल प्रीतीची अजब कहानी', 'मन उडू उडू झालं' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'टकाटक २', 'कन्नी', 'टकाटक', 'सरी' या सिनेमांमध्येही तो दिसला. 'राख' या वेब सीरिजमधून अजिंक्य प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.