मानसी नाईक करणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:13 IST2016-11-29T18:13:51+5:302016-11-29T18:13:51+5:30
सध्या मालिकांमध्ये हजार - पाचशेच्या नोटांवरची परिस्थिती दाखविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. काहे दिया परदेसनंतर ग सहाजणी या मालिकेतदेखील ...
.jpg)
मानसी नाईक करणार धमाल
ध्या मालिकांमध्ये हजार - पाचशेच्या नोटांवरची परिस्थिती दाखविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. काहे दिया परदेसनंतर ग सहाजणी या मालिकेतदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ग सहाजणी ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणि घडणाºया वास्तवाशी मिळत्या जुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाºया प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात आवडीने पहिली जात आहे. सध्या सुरु असलेल्या चलन बदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. बँकेतील कर्मचाºयांचे भावविश्व मांडणाºया या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या येत्या सोमवारच्या ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने या सहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्त ताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे.संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बँकेत काम करणाºया सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पोर्णिमा अहिरे, सुरभी भावे आणि मौसमी तोडवळकर या प्रमुख अभिनेत्रींनीं आपापल्या भूमिकेतून गं सहाजणीत रंग भरला आहे. बँकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर म्हणजे अतुल तोडणकर यांची धमाल मस्ती या भागात पाहता येणार आहे. स्टार प्रवाहच्या गं सहाजणी या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे यांनी केली असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन आले आहेत.