​मनिष गोयलला झळकायचेय बिग बॉसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 08:43 AM2017-08-02T08:43:12+5:302017-08-02T14:13:12+5:30

बिग बॉस ११ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाचा ...

Manish Goyal is in the Big Boss | ​मनिष गोयलला झळकायचेय बिग बॉसमध्ये

​मनिष गोयलला झळकायचेय बिग बॉसमध्ये

googlenewsNext
ग बॉस ११ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाचा आपणही भाग असावे असे अनेकांना वाटत असते. अभिनेता मनिष गोयललादेखील या कार्यक्रमात झळकण्याची इच्छा आहे. त्यानेच स्वतःने ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे.
मनिष गोयलने कहानी घर घर की, भाभी, कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिका देखील गाजल्या आहेत. तो मालिकांसोबतच नच बलिये या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला होता. या कार्यक्रमात त्याने त्याची पत्नी पूजा नरूलासोबत भाग घेतला होता. तसेच तो जरा नच के दिखा या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसला होता. आता त्याला बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हायचे आहे. 
मनिषने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केल्यानंतर आता त्याला बिग बॉसमध्ये झळकायचे आहे. याविषयी तो सांगतो, बिग बॉसचे आतापर्यंतचे अनेक सिझन मी आवडीने पाहिले आहेत. मी या कार्यक्रमाचा भाग बनावे अशी माझ्या कुटुंबीयांची आणि मित्रमंडळींची इच्छा आहे. माझा खरा स्वभाव लोकांसमोर यावा असे त्यांना वाटत आहे. मी खऱ्या आयुष्यात आहे, तसाच या घरात वावरलो तर मी हा कार्यक्रम जिंकेन असे त्यांचे म्हणणे आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात कोणकोण स्पर्धक झळकणार याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. आता या कार्यक्रमात प्रेक्षकांना कोण कोण स्पर्धक पाहायला मिळणार हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. मनिष बिग बॉसचा भाग बनल्यास त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद होईल यात काहीच शंका नाही. 

Also Read : ​Big Boss 11: सहभागी होणा-या ‘कॉमन मॅन’ला मानधन नाही !

Web Title: Manish Goyal is in the Big Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.