‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मधील मणिंदरसिंगला कलाकार नाहीतर क्रिकेटपटू व्हायचे होते स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:21 AM2018-02-02T08:21:17+5:302018-02-02T13:51:17+5:30

छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका ...

Maninder Singh was the star of 'Kah Hal, Mr. Panchal?' | ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मधील मणिंदरसिंगला कलाकार नाहीतर क्रिकेटपटू व्हायचे होते स्वप्न!

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मधील मणिंदरसिंगला कलाकार नाहीतर क्रिकेटपटू व्हायचे होते स्वप्न!

googlenewsNext
ट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेत कन्हैय्याची भूमिका साकारणा-या  मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तो स्वत: उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण त्याला भारतीयांच्या सर्वात आवडत्या खेळाचीही- क्रिकेटची- प्रचंड आवड आहे. इतकेच नव्हे, तर त्याला हा खेळ इतक्या उत्तम प्रकारे खेळता येतो की त्याच्या परिसरात त्याला सचिन म्हणूनच ओळखले जाते.पण छोट्या गावातील रहिवासी असल्याने त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभले नाही. त्यामुळे त्याला क्रिकेटर बनता आले नाही. क्रिकेटर बनण्याचे त्याचे स्वप्न अपुर्णच राहिले.परिणामी त्याने अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याने चांगलेच यश मिळविले आहे.अर्थात तरीही क्रिकेटवरील त्याचे प्रेम जराही कमी झाले नसून क्रिकेट खेळण्याची संधी दिसताच तो आनंदाने उडी मारून खेळण्यास सज्ज होतो.त्याच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्याने सांगितले,“क्रिकेटवर माझं प्रेम निरंतर आहे आणि राहील. मी जर
अभिनेता बनलो नसतो, तर मी भारतीय क्रिकेट संघात नक्कीच खेळलो असतो.चित्रीकरणानंतर वेळ असेल,तर मी तेव्हा क्रिकेट खेळतो ''मी शाळेत असताना आमच्या परिसरात होणार-या क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी मी सकाळी लवकर उठायचो. माझे मित्र मला आमच्या विभागातला सचिन तेंडुलकर म्हणायचे!”

Also Read:सेटवर बनले ओजस्वी अरोरा आणि आरिया अगरवाल नवे दोस्त

सोशल मीडियावर नवे मित्र जोडणे ही एक गोष्ट असली,तरी प्रत्यक्ष जीवनात नवे मित्र निर्माण होणे ही अगदी भिन्न गोष्ट आहे. ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेतील ओजस्वी आणि आरिया यांना या मालिकेच्या सेटवर एकमेकांमध्ये आपला घनिष्ठ मित्र सापडला. दिवसभर हे दोघेही या मालिकेच्या सेटवर एकत्र राहात असले, तरी त्यांना एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. या दोघींचे सूर चांगलेच जुळले असून त्या आपल्या हास्यविनोदाने मालिकेच्या सेटवरील वातावरण जिवंत करीत असतात. इतकेच नव्हे, तर चित्रीकरण संपल्यावरही त्या जेवायला आणि शॉपिंगला एकत्रच जातात. केवळ मालिकेतच नव्हे, तर वास्तव जीवनातही त्या एकमेकींच्या ख-या जिवलग मैत्रिणी बनल्या आहेत.

Web Title: Maninder Singh was the star of 'Kah Hal, Mr. Panchal?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.