खतरो के खिलाडीमध्ये मनवीर गुजर बनला मोनिका डोगराचा टिचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 17:24 IST2017-06-06T11:54:56+5:302017-06-06T17:24:56+5:30
खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा नवा सिझन काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनमध्ये एकापेक्षा एक कठीण स्टंट ...

खतरो के खिलाडीमध्ये मनवीर गुजर बनला मोनिका डोगराचा टिचर
ख रो के खिलाडी या कार्यक्रमाचा नवा सिझन काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनमध्ये एकापेक्षा एक कठीण स्टंट प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवण्यासाठी 10 स्पर्धकांमध्ये सध्या स्पर्धा रंगली आहे.
या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून हे सगळे स्पर्धक एकत्रच राहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत राहात असल्याने या सगळ्यांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांकडून काही ना काही तरी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोनिका डोगरा या कार्यक्रमात स्पर्धक असून ती एक चांगली गायिका आणि अभिनेत्री आहे. मोनिका चांगले हिंदी बोलते. पण तरीही तिला शुद्ध हिंदी बोलता येत नाही असे तिला वाटते आणि त्यामुळे ती सध्या तिचे हिंदी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा विजेचा मनवीर गुजर देखील या कार्यक्रमात स्पर्धक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मनवीरचे हिंदी खूपच चांगले आहे. त्यामुळे मोनिकाचे हिंदी सुधारण्यासाठी सध्या तो तिला मदत करत आहे.
![manveer gujar]()
कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान वेळ मिळाल्यास लगेचच मोनिका मनवीरकडून हिंदी शिकते. हिंदीतील कठिण शब्दांचा उच्चार कशाप्रकारे केला जातो हे देखील मनवीर तिला शिकवतो. मनवीरच्या मते मोनिका कोणतीही गोष्ट लगेचच आत्मसात करते आणि तिला हिंदी शिकण्यात चांगलाच रस आहे. त्यामुळे त्याला देखील हिंदी शिकवायला मजा येत आहे.
मोनिका संपूर्ण सिझन मनवीरकडून अशीच हिंदी शिकत राहिली तर कार्यक्रम संपेपर्यंत ती हिंदी भाषा अस्खलित बोलायला लागेल असे आपण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.