'कट्टी बट्टी' मालिकेत मंगेश देसाई साकारणार ही महत्वाची भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:32 IST2018-06-15T09:02:05+5:302018-06-15T14:32:05+5:30
अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली आणि ...
.jpg)
'कट्टी बट्टी' मालिकेत मंगेश देसाई साकारणार ही महत्वाची भूमिका!
अ मदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली आणि प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलं.या मालिकेत अभिनेता पुष्कर सरद पराग नावाच्या एका प्राध्यापकाची भूमिका सादर करत असून अभिनेत्री अश्विनी कासार ही पूर्व नावाच्या शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे.
नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की पूर्वा आणि परागचं लग्न मोडलं कारण पूर्वाला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे.जेव्हा पूर्वाचा गोंधळ उडतो आणि तिला मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा ती तिला पीएचडी साठी मार्गदर्शन करत असलेल्या पाठारे सरांकडून मार्गदर्शन घेते.या मालिकेत पठारे सरांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई साकारत आहे.मंगेश देसाई यांनी बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.त्यांची भूमिका देखील तितकीच सशक्त आहे.पूर्वा बोराडेचे हे पीएचडीचे सर, धनंजय पाठारे म्हणजे नगर मधील एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व शिस्तप्रिय, वेळेला महत्व देणारे आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या पाठारे सरांचे मार्गदर्शन म्हणजे पूर्वासाठी सुवर्णसंधीच. पूर्वला पीएचडीसोबतच आयुष्यात समोर येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जायचे याचं देखील मार्गदर्शन करत असतात.पाठारे सरांचं मार्गदर्शन म्हणजे हाताला धरून शिकवणं नव्हे तर आयुष्यात आलेल्या अनुभवांतून समोरच्याला शहाणं करणं.पूर्वच्या आयुष्यात अचानक आलेला लग्नाचा विषय, तिची द्विधा मनस्थिती आणि लग्न व पीएचडी यामध्ये तिची उडालेली तारांबळ या सगळ्यात तिला कठोर शब्दात पण योग्य ते मार्गदर्शन करणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे पाठारे सर.
मंगेश देसाईसोबत नकारात्मक भूमिका यशस्वीरित्या साकारत रसिकांच्या मनात घर केलेल्या अभिज्ञाला 'कट्टीबट्टी' या मालिकेतून हटके भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.यांत ती बबली स्वरुपाची अनुष्का ही भूमिका साकारली आहे.पराग आणि पूर्वाच्या प्रेमात आलेली बबली अनुष्का ही भूमिका साकारत अभिज्ञाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. अनुष्काच्या भूमिकेच्या माध्यमातून अभिज्ञाला हटके तितकीच सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी तिला लाभली. नकारात्मक भूमिका साकारल्याने अभिनय कौशल्याला वाव मिळाल्याचे अभिज्ञाला वाटते. या नकारात्मक भूमिकांमुळेच तिच्यातील अभिनय गुण विकसित झाले असून त्याबाबत तिने रसिकांसह साऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र याचवेळी नकारात्मक भूमिकांपेक्षा सकारात्मक भूमिका साकारणं आव्हानात्मक असल्याचे अभिज्ञाला वाटते.नकारात्मक भूमिकांमधून बाहेर पडत बबली अनुष्का अभिज्ञाने मोठ्या खूबीने साकारली आहे. त्यामुळेच की काय अभिज्ञाच्या 'खुलता कळी खुलेना' मालिकेतील मोनिका इतकंच प्रेम 'कट्टीबट्टी'च्या अनुष्काला रसिकांकडून मिळत आहे.