'बाथरूममध्ये करतो अश्लील चाळे', 'लॉकअप'मध्ये मंदाना करीमीने या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:08 IST2022-03-29T15:08:21+5:302022-03-29T15:08:56+5:30
'लॉकअप' (Lock Upp) या रिएलिटी शोमध्ये मंदाना करीमी (Mandana Karimi)ने सर्वांसमोर सांगितले की बाथरूममध्ये असे काही घडते ज्याबद्दल मला आणि सायशाला माहित आहे. हे खूपच भयानक आहे.

'बाथरूममध्ये करतो अश्लील चाळे', 'लॉकअप'मध्ये मंदाना करीमीने या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप
'लॉक अप' (Lock Upp) या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक त्यांच्या आयुष्याशी निगडीत असे खुलासे करताना दिसत आहेत, जे जाणून सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण नुकतेच एका अभिनेत्रीने आपल्या सहकारी स्पर्धकांचा अशा प्रकारे पर्दाफाश केला की सर्वांचीच तोंडे उघडी राहिली. अलीकडेच मंदाना करीमी(Mandana Karimi)ने लॉकअपमध्ये केलेले वक्तव्य खूप चर्चेत आहे.
मंदाना करीमीने वाईल्ड कार्डच्या मदतीने या शोमध्ये प्रवेश केला आहे. तिच्या एंट्रीने शोमध्ये जान आली आहे. खरेतर, मंदानाने अली मर्चंटवर शोच्या होस्ट कंगनाच्या समोर आरोप केले होते. तिने अलीवर बाथरूममध्ये हस्तमैथुन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मंदानाला मध्येच थांबवताना कंगना राणौतनेही तिचा क्लास घेतला पण तिच्याकडून संपूर्ण गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मंदानाने केली पोलखोल
मंदाना करीमी सर्वांसमोर म्हणाली, 'बाथरुममध्ये काहीतरी घडते ज्याबद्दल मला आणि सायशाला माहीत आहे. ते पुरेसे वाईट आहे. हे कचऱ्यापेक्षा वाईट आहे. जर तुम्ही इतक्या मुलींसोबत रहात असाल आणि तुम्हाला एकच बाथरूम वापरायचे असेल आणि तुम्ही हे सर्व करत असाल... तर तुमचे व्यक्तिमत्त्व नक्कीच समजते.'
मदाना थांबते आणि खाजगी जागेत जाऊन संपूर्ण गोष्ट सांगते. कंगनाने तिला आपले म्हणणे सर्वांसमोर स्पष्ट करायला सांगितले. मंदाना करीमी पुढे म्हणते, 'एक दिवस मी बाथरूममध्ये गेले होते, माझ्यानंतर सायशाला जायचे होते. ती दिवसभर अस्वस्थ होती. माझ्यानंतर एकाच व्यक्तीने बाथरूमचा वापर केला होता. तो अली होता, तिथे कोणीतरी हस्तमैथुन केले होते आणि सर्व काही तिथेच होते.
अली मर्चंट प्रचंड संतापला
मंदाना करीमीचे म्हणणे ऐकून अली मर्चंट संतापला. त्याने कंगना राणौतसमोर मंदाना करीमीवर ओरडण्याचा प्रयत्न केला आणि तिला गप्प बसण्यास सांगितले. सोशल मीडियावरही हे प्रकरण तापताना दिसत आहे. काही लोक मंदाना करीमीच्या बिनधास्त वृत्तीचे कौतुक करत आहेत, तर काही लोक अली मर्चंटच्या समर्थनात उतरतानाही दिसत आहेत.