वो अपना सा मध्ये रिद्धी डोग्राची जागा घेणार मानसी साळवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 17:17 IST2017-10-10T11:47:51+5:302017-10-10T17:17:51+5:30
झी टिव्हीचा लोकप्रिय फिक्शन शो वो अपना सा या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील ...

वो अपना सा मध्ये रिद्धी डोग्राची जागा घेणार मानसी साळवी
झ टिव्हीचा लोकप्रिय फिक्शन शो वो अपना सा या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत सुदीप साहिर आदित्यची भूमिका तर दिशा परमार जान्हवीची आणि रिद्धी डोगरा निशाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या कथेला नेहमीच काही ना काही कलाटण्या मिळत असतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लोकांना लागलेली असते. या मालिकेतील निशाची भूमिका साकारणारी रिद्धी डोगरा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. पण आता रिद्धीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. रिद्धी या मालिकेचा निरोप घेणार असून या मालिकेत रिद्धीची जागा आता मानसी साळवी घेणार आहे. मानसीने चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. याविषयी मानसी सांगते, वो अपना सा ही एक अतिशय चांगली मालिका आहे आणि त्याला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. निशाच्या भूमिकेची प्रेक्षकांकडून नेहमीच स्तुती केली जाते. आता मी या मालिकेत निशाची भूमिका साकारणार आहे. निशाच्या पात्राला नकारात्मक छटा असल्याने ही भूमिका साकारण्याचा अनुभव खूपच चांगला असणार असल्याची मला खात्री आहे. माझ्या करियरची सुरुवात मी झी चॅनेलवरून केली होती, त्यामुळे मी या वाहिनीवर परत येत आल्याचा मला आनंद होत आहे आणि वो अपना सा मधील माझ्या भूमिकेसाठी मी अतिशय उत्सुक आहे. मला विश्वास आहे की प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल.”
निशा म्हणून मानसीच्या प्रवेशाने मालिकेमध्ये अनेक कलाटण्या येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण होणार आहे. ही मालिका २० वर्षांची झेप घेणार असून त्यानंतर आदित्य, जान्हवी आणि निशा यांच्या जीवनात काय बदल घडवणार हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.
वो अपना सा या मालिकेचे नाव मानसीच्या खूपच जवळचे आहे. कारण तिने काही वर्षांपूर्वी कोई अपना सा या मालिकेत काम केले होते आणि ही मालिका प्रचंड गाजली होती.
Also Read : छोटा पडदा हे लेखकांचे माध्यमः मानसी साळवी