टॉप ५ फायनलिस्ट ठरले! तर 'या' स्पर्धकाचं झालं मिड-वीक एलिमिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:44 IST2025-12-03T11:44:04+5:302025-12-03T11:44:43+5:30
शोला अखेर त्याचे टॉप पाच स्पर्धक मिळाले आहेत. तर एका स्पर्धकाचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.

टॉप ५ फायनलिस्ट ठरले! तर 'या' स्पर्धकाचं झालं मिड-वीक एलिमिनेशन
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस'. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सतत काही ना काही सुरु असते. सध्या 'बिग बॉस'चा १९ वा सिझन चर्चेत आहे. या सिझनचा विजेचा कोण होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शोला अखेर त्याचे टॉप पाच स्पर्धक मिळाले आहेत. तर एका स्पर्धकाचा 'बिग बॉस'मधील प्रवास संपला आहे.
गेल्या आठवड्यात कमी मतांमुळे शाहबाज बदेशा तर बिग बॉसचा नियम मोडल्यामुळं अशनूर कौरला शो सोडावा लागला. यानंतर सहा स्पर्धकांनी फिनाले वीकमध्ये प्रवेश निश्चित केला होता. ज्यामध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, तान्या मित्तल, मालती चहर आणि प्रणित मोरे हे होते. एपिसोड प्रसारित होण्याआधी समोर आलेल्या माहितीनुसार या सहामधून मालती चहर हिचे मिड-वीक एलिमिनेशन झालं आहे.

'बिग बॉस १९' चे टॉप ५ फायनलिस्ट
गौरव खन्नानं 'तिकीट टू फिनाले' टास्क जिंकून सर्वात आधी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. या अंतिम एव्हिक्शननंतर आता ट्रॉफीसाठी गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे हे पाच स्पर्धक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहू शकता?
ग्रँड फिनाले रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर ओटीटी लाईव्ह स्ट्रीमिंग रात्री ९ वाजता जिओ हॉट स्टारवर असेल. 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी कोण जिंकणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.