'मुस्कान'च्या निर्मात्यांनी अरिना डेबाबत घेतला हो मोठा निर्णय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 07:15 IST2018-08-07T17:34:40+5:302018-08-08T07:15:00+5:30

कथानकामध्ये बदल करण्याच्या योजनेसह निर्माते अरिना ऊर्फ आरतीची ह्या शोमधील स्क्रीन स्पेस कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Makers of Musakaan planning Arina's exit | 'मुस्कान'च्या निर्मात्यांनी अरिना डेबाबत घेतला हो मोठा निर्णय ?

'मुस्कान'च्या निर्मात्यांनी अरिना डेबाबत घेतला हो मोठा निर्णय ?

मुस्कान ह्या शोमध्ये आरतीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अरिना डे ने ह्या शोमधून आपले पदार्पण केले. हिंदी टेलिव्हिजन
उद्योगात प्रवेश करण्यासाठी ती अशाच संधीच्या शोधात होती.पण आपल्या पहिल्या शोमधून मोठे नाव कमावण्याचे तिचे स्वप्न आता अपुरे राहिल असे दिसत आहे. अरिनाची भूमिका ह्या मालिकेतून काढण्यात येणार आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

ह्या अफवांवर विश्वास ठेवायचा ठरवले तर निर्माते अरिना डे च्या प्रदर्शनाबाबत समाधानी नाहीयेत. तसेच आगामी ट्रॅकमध्ये अरिना साकारत असलेल्या आरती ह्या आईपेक्षा मुस्कानवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कथानकामध्ये बदल करण्याच्या योजनेसह निर्माते अरिना ऊर्फ आरतीची ह्या शोमधील स्क्रीन स्पेस कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत.सूत्रांनुसार, मुंबईमध्ये नवीन असलेल्या अरिना डे ला आपले करिअर संपुष्टात येईल अशी भीती वाटत आहे. मात्र, निर्माते आरतीला जेव्हा गरज लागेल तेव्हा मालिकेत आणतील. मुस्कानचा आगामी ट्रॅक प्रेक्षकांना नक्कीच रंजक असणार आहे.


‘मुस्कान’ ही नवी मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे.या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीला चित्रपटांतील भूमिका गमवाव्या लागल्या असत्या आणि हर्षालीला चित्रपटातील भूमिकांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने या मालिकेत भूमिका रंगविण्यास नकार दिला, असे बोलले जाते. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.या मालिकेला यापूर्वी ‘तवायफ’ आणि ‘मीना बाजार’ अशी शीर्षके देण्यात आली होती; परंतु आता या मालिकेचे ‘मुस्कान’ असे नामकरण करण्यात आले आहे.“यापूर्वी तवायफ मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी हीना खान, टिना दत्ता, माही विज वगैरे बड्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु आता नेहा मर्दा ही सुंदर अभिनेत्री ही भूमिका साकारील, अशी दाट शक्यता आहे,” असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले. 

Web Title: Makers of Musakaan planning Arina's exit