एडिटींगवाल्याला 21 तोफांची सलामी...! मकरंद अनासपुरे ‘शार्क टँक इंडिया’मध्ये जातो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:21 IST2022-02-02T15:18:22+5:302022-02-02T15:21:15+5:30
Viral Video : सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया’ या शोवरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. शिवाय एक एडिटेड व्हिडीओही तुफान गाजतोय.

एडिटींगवाल्याला 21 तोफांची सलामी...! मकरंद अनासपुरे ‘शार्क टँक इंडिया’मध्ये जातो तेव्हा...
‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) हा रिअॅलिटी शो सध्या तुफान गाजतोय. अमेरिकन रिअॅलिटी शोवर आधारित असलेल्या या पहिल्या वहिल्या बिझनेस रिअॅलिटी शोची सध्या तरूणाईत जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सात यशस्वी तरूण उद्योजक अर्थात सात शार्क आणि त्यांच्यासमोर कल्पक बिझनेस आयडिया मांडणारे होतकरू तरूण, अशी शोची संकल्पना. हे तरूण आपल्या बिझनेस आयडिया सांगतात आणि शार्क त्यांच्या कंपनीत भागीदार होत बिझनेस डिल फायनल करतात. टीव्हीवरच्या अनेक रिअॅलिटी शोच्या तुलनेत हा अनोखा शो चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. सोशल मीडियावरही या शोची चांगलीच हवा आहे.
सोशल मीडियावर या शोवरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. शिवाय एक एडिटेड व्हिडीओही तुफान गाजतोय. होय, या व्हिडीओत मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) शार्क टँग इंडियाच्या मंचावर त्याची बिझनेस आयडिया शेअर करताना दिसतोय.
मकरंद अनासपुरे याच्याच ‘दे धक्का’ चित्रपटातील काही सीन या व्हिडिओत एडिट करून वापरण्यात आले आहेच. समोर बसलेले शार्क आणि मकरंद यांच्यातले संवाद खळखळून हसायलला भाग पाडतात. ‘आम्हीमिमकर’ या इन्स्टा अकाऊंटवर हा भन्नाट शेअर केला गेला आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच भन्नाट आहेत. एडिटींगवाल्याला 21 तोफांची सलामी, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. 1 नंबर, कडक, हार्ड अशा शब्दांत चाहत्यांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.