१४ वर्षांचा संसारानंतर घटस्फोटाची घोषणा आणि अवघ्या २४ तासांत नवऱ्यासोबतचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:04 IST2026-01-05T15:02:31+5:302026-01-05T15:04:34+5:30
काल दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर घटस्फोटाची घोषणा केली होती.

१४ वर्षांचा संसारानंतर घटस्फोटाची घोषणा आणि अवघ्या २४ तासांत नवऱ्यासोबतचा फोटो केला शेअर
Mahhi Vij With Ex-husband Jay Bhanushali : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या माही विज आणि जय भानुशाली यांनी १४ वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काल दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. हा निर्णय एकमेकांच्या संमतीने, समजुतीने घेतला असल्याचं त्यानं सांगितलं. घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज माहीनं जय भानुशालीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माही विजनं घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर इन्स्टाग्रामवर काही क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. तिच्या या क्रिप्टिक पोस्ट जयसाठी असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेर माहीने जयसोबतचा एक फोटो शेअर करत त्या पोस्ट जयसाठी नव्हत्या असं स्पष्ट केलंय. माहीने या पोस्टमध्ये लिहिले, "हे आम्ही आहोत. माझ्या मागील सर्व पोस्ट जयसाठी नव्हत्या. लोकप्रियतेसाठी कोणी इतके खाली कसे जाऊ शकते याचे मला आश्चर्य वाटते".

दरम्यान, माही विज आणि जय भानुशाली हे तारा, खुशी आणि राजवीर यांचे पालक आहेत. जय आणि माही यांना तारा ही स्वतःची मुलगी आहे. त्याआधी २०१७ मध्ये त्यांनी खुशी आणि राजवीर या दोन मुलांना दत्तक घेतले होते. जय आणि माही दोघांचेही आपल्या मुलांंवर खूप प्रेम आहे. ते मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येतात. निवेदनात म्हटल्यानुसार, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि शांततेसाठीच त्यांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे.