माझ्याकडून घडलेल्या चुका तू ...; 'हास्यजत्रा' फेम रसिकाच्या नवऱ्याची लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 13:51 IST2024-02-09T13:45:45+5:302024-02-09T13:51:02+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने खास पोस्ट केलीय (Maharashtrachi Hasyajatra) (Rasika Vengurlekar)

माझ्याकडून घडलेल्या चुका तू ...; 'हास्यजत्रा' फेम रसिकाच्या नवऱ्याची लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रसिका हास्यजत्रेत विविध भूमिका साकारत असते. रसिका हास्यजत्रेतील गुणी अभिनेत्रींपैकी एक आहे. रसिकाच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा नवरा अनिरुद्ध उर्फ सनी शिंदेने तिच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देणारी पोस्ट लिहीली आहे. सनीने रसिका आणि त्याचा एक जुना फोटो पोस्ट करत खास पोस्ट केलीय.
सनी लिहीतो, "माऊ माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्यासोबत असतेस..अशीच माझ्या सोबत आयुष्यभर रहा..
माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस.. माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही.. त्याच्यासोबत असणारी माणसं,पाठीशी असलेली त्याची साथ,यामुळे त्याला बळ मिळतं..आणि मी यशस्वी होण्यामध्ये मोलाचा आणि जास्त वाटा तुझा आहे.."
सनी पुढे लिहीतो, "तुलाही आयुष्यात मोठं होताना बघुन खूप आनंद होतोय. खूप कौतुक वाटत तुझं,तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी आहे तुझ्यासोबत कायम ..अशीच मेहनत करूया दोघांनी मिळून,कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे,आणि ह्या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत आहे.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा माऊ." या पोस्टवर रसिकाने सुद्धा रिप्लाय करत प्रेम दर्शवलं आहे.