"जिंदगी मै कुछ लोग चप्पल की तरह...", हरभजन सिंगचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला, "सर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:19 PM2023-11-04T18:19:30+5:302023-11-04T18:22:00+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने शेअर केला क्रिकेटर हरभजन सिंगचा व्हिडिओ, म्हणाला...

maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared cricketer harbhajan singh video | "जिंदगी मै कुछ लोग चप्पल की तरह...", हरभजन सिंगचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला, "सर..."

"जिंदगी मै कुछ लोग चप्पल की तरह...", हरभजन सिंगचा 'तो' व्हिडिओ गौरव मोरेने केला शेअर, म्हणाला, "सर..."

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतलेल्या गौरवला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे गौरव घराघरात पोहोचला. दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर गौरवने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या गौरवचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन गौरव चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 

गौरव आगामी प्रोजेक्टबद्दल पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावरुन विविध पोस्टही शेअर करताना दिसतो. सध्या त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा रंगली आहे. भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो "जिंदगी में कुछ लोग चप्पल की तरह होते है...जो साथ तो देते है पर पिछे से किचड भी बहुत उछालते है" असं म्हणताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवरुन हरभजनने हा व्हिडिओ शेअर करत "सही कहा या गलत?" असं म्हटलं आहे. हरभजनचा हा व्हिडिओ गौरवने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. 

हरभजन सिंगचा हा व्हिडिओ शेअर करत गौरवने "वाह सर बरोबर बोललात", असं कॅप्शनही दिलं आहे. गौरवच्या या स्टोरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, हास्यजत्रेतून लोकप्रियता मिळवलेल्या गौरवने अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. 'हवाहवाई', 'बॉईज ४' या चित्रपटांत गौरव झळकला आहे. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared cricketer harbhajan singh video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.