"ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच...", MI च्या पहिल्या विजयानंतर गौरव मोरेची भन्नाट रील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:44 AM2024-04-08T10:44:18+5:302024-04-08T10:46:24+5:30

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनेही हजेरी लावली होती. MIने सामना जिंकल्यानंतर गौरवने खास रील व्हिडिओ बनवला आहे.

maharashtrachi hasyajatra fame gaurav more made reel for romario shepherd after mumbai indians wins first match in ipl 2024 | "ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच...", MI च्या पहिल्या विजयानंतर गौरव मोरेची भन्नाट रील

"ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच...", MI च्या पहिल्या विजयानंतर गौरव मोरेची भन्नाट रील

सध्या देशात सर्वत्र आयपीएलची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सततच्या पराभवानंतर अखेर मुंबई इंडियन्सने रविवारी(७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सबरोबर झालेल्या सामन्यात आयपीएलच्या १७व्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात रोमारियो शेफर्डने ९ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या २३४ धावांमध्ये रोमारियोची खेळी निर्णायक ठरली. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेही हजेरी लावली होती. MIने सामना जिंकल्यानंतर गौरवने खास रील व्हिडिओ बनवला आहे.  रोमारियोने एका ओव्हरमध्ये तब्बल ३२ धावा केल्याने गौरवने त्याचं खास कौतुक केलं आहे.  व्हिडिओत गौरव म्हणतो, "ज्याने १ ओव्हरमध्ये ३२ रन मारियो, तोच मुंबई इंडियन्सचा रोमारिओ". गौरवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईच्या पहिल्या विजयाचा आनंद चाहते जल्लोषात साजरा करत आहेत.  या सामन्यानंतर मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आली आहे.  मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर आता चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame gaurav more made reel for romario shepherd after mumbai indians wins first match in ipl 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.