'अमेरिकेत गटारी सेलिब्रेशन जोरात चाललंय'; प्रियदर्शनीच्या फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:23 IST2023-07-17T15:23:01+5:302023-07-17T15:23:33+5:30
Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मागे एक व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला पाहिल्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली.

'अमेरिकेत गटारी सेलिब्रेशन जोरात चाललंय'; प्रियदर्शनीच्या फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रियदर्शनीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे. येथील अनेक फोटो, व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच तिच्या एका फोटवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा एक फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा फोटो प्रियदर्शनीने न्यूयॉर्कमध्ये काढला असून 'न्यूयॉर्क शहराने मला खूप आनंद दिलाय', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोमध्ये तिच्यासोबतच आणखी एका व्यक्तीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.
'एवढे लांब पाय असतील तर..'; प्रियदर्शनीच्या बीचवरील 'त्या' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
या फोटोमध्ये प्रियदर्शनीने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप, मिनी स्कर्ट आणि त्यावर साजेसे पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे तिने ज्या ठिकाणी हा फोटो काढला तेथे तिच्या मागचे एक व्यक्ती जमिनीवर लोळत पडला होता. ज्याला पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
प्रियदर्शनीच्या फोटोवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.“हे सौंदर्य पाहून एक माणूस मागे चक्कर येऊन पडला,” असं पृथ्वीक प्रताप म्हणाला. तर,न “मागे गटारी सेलिब्रेशन जोरात चाललंय…”, “अमेरिकेतील लोकांना अजून हे सौंदर्य सहन व्हायला वेळ लागेल… त्यामुळे त्यांना ग्लानी येणे स्वाभाविक आहे” , अशा कितीतरी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान,महाराष्ट्राची हास्यजत्राची सगळी टीम सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तर, दुसरीकडे आता अमेरिका दौरा खूप झाला पुन्हा कार्यक्रम सुरु करा अशी मागणी भारतीय प्रेक्षक करु लागला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची आणि त्यातील कलाकारांची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ लक्षात येते.