'आपला प्रत्येक दिवस असाच...'; निखील बनेनी शेअर केलं चाळीतलं लाईफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:15 IST2023-04-18T17:14:28+5:302023-04-18T17:15:30+5:30
Nikhil bane: निखील भांडूपमध्ये एका चाळीत राहत असून त्याने मोठा स्ट्रगल केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीही त्याने अनेक लहानमोठी काम केलं आहेत.

'आपला प्रत्येक दिवस असाच...'; निखील बनेनी शेअर केलं चाळीतलं लाईफ
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MaharashtraChi Hasya Jatra) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे निखील बने (Nikhil Bane). एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आलेल्या या विनोदवीराने आज अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, आजही त्याच्यातील साधेपणा प्रेक्षकांना भावतो. निखील आजही मुंबईतील चाळीत राहत असून त्याने त्याच्या चाळीतलं जग कसं आहे हे व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे.
निखील सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळेच प्रोफेशनल लाइफसोबत तो पर्सनल आयुष्यातील गोष्टीही कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यात अनेकदा तो काही मजेशीर रिल्सही शेअर करतो. यावेळीदेखील त्याने असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
'आपला प्रत्येक दिवस असाच', असं कॅप्शन देत निखीलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इतर लोक नवनवीन कार खरेदी करताना दिसत आहेत. तर, निखील मात्र, रोजच्या प्रमाणे घरात पाणी भरत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांनी आमचीदेखील सेम अवस्था आहे असं म्हणत कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, निखील भांडूपमध्ये एका चाळीत राहत असून त्याने मोठा स्ट्रगल केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीही त्याने अनेक लहानमोठी काम केलं आहेत. यात खासकरुन त्याने अनेकदा बॅक स्टेजलाही काम केलं आहे. त्यातूनच त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची ऑफर मिळाली.