वनिता खरातनं शेअर केला सिंगापूरमधील Unseen व्हिडीओ, म्हणाली - 'जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:14 PM2024-05-29T12:14:18+5:302024-05-29T12:14:34+5:30

छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेला आणि लोकप्रिय असा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'.

Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat Shared Unseen Video Of Singapore Live Shows | वनिता खरातनं शेअर केला सिंगापूरमधील Unseen व्हिडीओ, म्हणाली - 'जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम...'

वनिता खरातनं शेअर केला सिंगापूरमधील Unseen व्हिडीओ, म्हणाली - 'जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम...'

छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेला आणि लोकप्रिय असा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या ही टीम जगभर गाजत असून सर्वच मराठी प्रेक्षक त्यांना उदंड प्रतिसाद देत आहेत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी नुकताच सिंगापूर दौराही केला. 

हास्यजत्रेची टीम नुकतेच सिंगापूरमध्ये पोहचली आहे. तिथे या कलाकारांचा लाईव्ह शो पार पडला आहे. तिथल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिवस रात्र मेहनत घेतली. वनिता खरातने (Vanita Kharat) सिंगापूरमधील थिएटरचा एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत यांच्या परफॉर्मन्सची झलक सुद्धा पाहायला मिळत आहे.

वनिताने पोस्ट शेअर करत लिहिले, 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला आता फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.Thank you Singapore इतकं प्रेम दिल्याबद्दल'. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  वनिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत 'ग्रेट शो ….. ग्रेट टीम' अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वीच हास्यजत्रेची संपूर्ण टीम यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती.

Web Title: Maharashtrachi Hasya Jatra Fame Vanita Kharat Shared Unseen Video Of Singapore Live Shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.